संस्कार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल पहेला येथील शाळेत मार्गदर्शन
ही बातमी आहे पहेला येथून
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता स्नेहसंमेलनाची गरज असल्याचे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी संस्कार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल पहेला येथे दिनांक १ मार्च 2026 ला स्नेहसंमेलना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष कुलसंत दहिवले उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील सोनाली मारबते उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी अनेक गीतांवर नृत्य सादर करून पालक व शिक्षकांचे मन आकर्षित केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मुख्याध्यापक वैष्णवी कुथे, शिक्षिका सलीमा उके,लक्ष्मी कोसरे ,प्रणाली अतकरी, रेवती कावळे ,दिव्या सोनवणे व मदतनीस पोर्णिमा भांबोरे व पालकांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या