Ticker

6/recent/ticker-posts

वाळू तस्करांची फौजदाराला जीवे मारण्याची धमकी

रायल्टी बाबत विचारणा केली असता वाळू तस्कर फौजदारावर भडकले झटापटी करून घातली हुजत चौघा विरुद्ध गुन्हा दाखल 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
श्रीक्षेत्र माहूर :-माहूर पोलीस ठाण्याचे पोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याप्रमाणे ते दि 02/03/2026 रोजी वेळ 11:50 वा. सुमारास सहयाद्री टी-पॉईन्ट समोर पुसद जाणारे रोडला जय भोले स्टील दुकान समोर आम्हाला एक वाळुचा टाटा कंपनीचा टिपर दिसला असता आम्ही जवळ जावुन टिपर चालक यास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालकानेउर्मटपणे रॉयल्टी नाही, म्हणुन अपमानजनक भाषा वापरली. सोबतच दूरध्वनी करून इतर तीघांना बोलावून झटापटी हुजत बाजी घातल्याने पो उप नी संदिप  अन्येबोईनवाड यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ती पण येथे टिप्पर चालकास थांबवून टिपरची वाळुची रॉयल्टी नसल्यास कायदेशीर कार्यवाही करु, असे सांगितले असता त्याने टिपर क्र.MH 29 CM 0676 चा मालक राहुल मुसळे, रा. टाकळी ता. माहूर यास फोन करुन बोलावुन घेतले. टिपर मालक राहुल मुसळे हा आमच्या जवळ येवुन माझे टिपर आहे, कोण अडविले, तुला माहित नाही काय, मी कोण आहे, झवण्या, असे म्हणुन गंभीर हुज्जत घालुन वाद घालुन शिवीगाळ करित होता. तेव्हा आम्ही मदतीसाठी पो.स्टे. माहूर येथील पो.काँ./2128 पवन राऊत यांना फोन करुन बोलावुन घेतले.पो.काँ./2128 पवन राऊत हे पो.स्टे. 112 मोबाईल घेवुन सोबत होमगार्ड पलटन नायक सुरेश सिरसाठ, होमगार्ड 793 भगत, होमगार्ड 804 सलमान खान असे आले असता त्यांना सदर टिपर संशयास्पद असुन त्याचे कागदपत्रांची चौकशी करु पोलीस स्टेशनला घेवुन चला, असे सांगितले. तेव्हा शक्ती ठाकुर, एकनाथ मानकर, टिपर चालक अमित पावलबुद्धे सदर ठिकाणी जमले. तेव्हा टिपर क्र.MH 29 CM 0676 चा मालक राहुल मुसळे, शक्ती ठाकुर, एकनाथ मानकर, टिपर चालक अमित पावलबुद्धे हे आमचे अंगावर मारण्यासाठी येवुन आमच्या सोबत धक्का-बुक्की करुन गंभीर वाद घालुन शिवीगाळ करित होते व तुला जीवंत सोडणार नाही, असे राहुल मुसळे, शक्ती ठाकुर व एकनाथ मानकर बोलत होते. शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने अडथळा निर्माण करित होते.

 दि 02/03/2026 रोजी वेळ 11:50 वा. सुमारास सहयाद्री टी-पॉईन्ट समोर पुसद जाणारे रोडला जय भोले स्टील दुकान समोर येथे 1) राहुल मुसळे, 2) शक्ती ठाकुर, 3) एकनाथ मानकर, 4) टिपर चालक अमित पावलबुद्धे हे टिपर क्र.MH 29 CM 0676 ची वाळुची रॉयल्टीचे कारणावरुन आमचे अंगावर मारण्यासाठी येवुन आमच्या सोबत धक्का-बुक्की करुन गंभीर वाद घालुन शिवीगाळ करुन तुला जीवंत सोडणार नाही, असे राहुल मुसळे, शक्ती ठाकुर व एकनाथ मानकर व टिपर चालक अमित पावलबुद्धे यांनी बोलुन आम्ही करित असलेले शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने अडथळा निर्माण केला; म्हणुन माझी त्यांचे विरुध्द कलम 132,121(1),352,351(1) (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता-2023. प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.
अशी फिर्याद दिल्याने चौघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली तर दोघेजण फरार झाले आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या