परमपूज्य महंत श्री मधुसूदन जी भारती महाराज यांचे दर्शन घेत तब्येतीची केली विचारपूस
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण यांनी अचानकपणे माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान गाठून श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेत महंत श्री प पू मधुसूदनजी भारती महाराज यांचे दर्शन घेऊन तब्येतीची विचारपूस करत श्री दत्तप्रभू श्री रेणुका माता चरणी जगात सुख शांती समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना केली
यावेळी श्री दत्त शिखर संस्थान येथे श्याम भारती महाराज यांनी अशोकराव चव्हाण यांचा सत्कार केला तर श्री रेणुका देवी संस्थान येथे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी यांनी सत्कार मातेचा महाप्रसाद दिला यावेळी श्री दत्त शिखर संस्थान सह रेणुका माता संस्थान वर सुरू असलेल्या विकास कामांचा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे उपविभागीय अभियंता डि के भिसे यांच्याकडून आढावा घेतला
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव यांचे सोबत माजी आमदार अमरनाथ राजुरकर भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील नागेलीकर महापौर कविताताई मुळे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे प्रवीण साले संजय देशमुख लहानकर निलेश पावडे किशोर भवरे नगराध्यक्ष फिरोज दोसानी भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के माजी नगराध्यक्ष प्रा राजेंद्र केशवे डॉ निरंजन केशवे संजय राठोड अनिल वाघमारे कांतराव घोडेकर नगरसेवक गोपू महामुने हाजी उस्मान खान पठाण किशोर जगत विनायक मुसळे अपील बेलखोडे विजय आमले नंदकुमार जोशी सय्यद रहमत अली दिलीप मुनगिलवार रामकिसन केंद्रे अजय पवार यांचे सह एमआयएमचे युवा नेते इरशाद भाई मकरानी यांनी भेट घेऊन सत्कार केला यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या