Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या विरोधात जलसमाधी आंदोलकांचा इशारा.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-पाठबंधारे विभागाच्या वतीने सीना नदी काठच्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी वसुलीसाठी अधिकाऱ्यांकडून प्रचंड तगादा लावण्यात येत आहे. खरे पाहिले तर यंदाच्या पावसाळ्यात सीना नदीला आलेल्या प्रचंड पुराने आणि झालेल्या अतिवृष्टी ने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस शेती तसेच इतर पिकां बरोबर शेतजमिनी ही मोठ्या प्रमाणात खरडून वाहून गेल्या आहेत.  प्रत्यक्षात जमिनीचं जागेवर राहिल्या नाहीत. त्यामुळे पाठबंधारे विभागाकडून आकारलेली पाणीपट्टी शेतकऱ्यांना भरणे अशक्य आहे. त्यामुळे पाठबंधारे विभागाने शेतकऱ्यांकडून लावलेली पठाणी वसुली बंद करावी. आणि शेतकऱ्यांना आज पर्यंतची पाणीपट्टी माफ करावी.
  

तसेच सीना माढा बोगदा योजना ही विना खर्ची ( no mentance ) असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात आकारण्यात येणारी वसुली त्वरित थांबवण्यात यावी अन्यथा प्रहार शेतकरी संघटना सीना नदीत उड्या घेत 24 मार्च रोजी जलसमाधी आंदोलन करेल. होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल.

त्या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, युवा नेते उंदरगावचे उपसरपंच समाधान मस्के, प्रहार चे विद्यार्थी सचिव संतोष कोळी, भास्कर कदम, रयत चे अण्णा जाधव यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या