चित्रा न्युज प्रतिनिधी
वरोरा / भद्रावती : होळीच्या दिवशी वरोरा शहरातील कर्मवीर वॉर्ड परिसरात एका विवाहित महिलेवर घरात घुसून चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी विक्की बावणे रा.भद्रावती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय बालाजी लिहीतकर (वय ५०) हे आपल्या पत्नी राखी अजय लिहीतकर (वय ४०) व मुलासह कर्मवीर वॉर्ड, बौद्ध विहारजवळ वरोरा येथे वास्तव्यास आहेत. राखी लिहीतकर या काही वर्षांपूर्वी भद्रावती येथील पेट्रोल पंपावर काम करत असताना आरोपी विक्की बावणे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी अधूनमधून त्यांच्या घरी येत व फोनद्वारे संपर्क साधत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारास लिहीतकर कुटुंबीयांनी मनाई केली होती.
दि.३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास
आरोपी विक्की बावणे हा लिहीतकर यांच्या घरासमोर येऊन राखी, दरवाजा उघड असा आरडाओरडा करीत होता. दरवाजा न उघडल्याने त्याने दाराला लाथ मारून तोडण्याचा प्रयत्न केला. दार तुटेल या भीतीने राखी यांनी दरवाजा उघडताच आरोपीने माझा फोन का उचलत नाहीस? तुझा मर्डर करतो, अशी धमकी देत कमरेतील चाकू काढून राखीच्या छातीवर दोन वार केले.
या हल्ल्यात राखी लिहीतकर गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली व जखमी महिलेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी विक्की बावणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार करीत आहेत.त उपचारासाठी दाखल केले.


0 टिप्पण्या