Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन !

७ मार्च वानोळा ,  १४ मार्च रोजी सिंदखेड  येथे होणार शिबीर 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  अभियानांतर्गत समाधान शिबिर घेण्यात येणार आहे.  माहूर तालुक्यातील  वानोळा महसूल मंडळ येथे ७ मार्च रोजी माहूर तालुक्यातील वानोळा महसूल मंडळातील वानोळा येथे व १४ मार्च रोजी माहूर तालुक्यातील सिंदखेड महसूल मंडळातील सिंदखेड येथे  सदर शिबिर आयोजनाचे अनुषंगाने  राहुल कर्डिले  जिल्हाधिकारी नांदेड यांनी नुकतीच व्हीडीओ कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे.
       सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले की, सर्वप्रथम सदर शिबिराबाबत महसूल मंडळातील प्रत्येक गावांमध्ये व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. शिबिराची माहितीपासुन गाव-वाडी-तांडे यामधील एकही व्यक्ती वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी वानोळा आणि सिंदखेड महसूल मंडळातील सर्व गावांचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक यांनी वर नमूद महसूल मंडळातील शिबिराचे आयोजनाबाबत आणि सदर शिबिरामधून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन दयावयाच्या सेवेबाबत व्यापक प्रमाणात प्रसिध्दी दयावी. प्रत्येक गावामध्ये दवंडीव्दारे शिबिराबाबत माहिती देण्यात यावी. तसेच गावोगावचे चावडीवर प्रसिध्दीपत्रक लावण्यात यावे. सोशल मिडीयावरुन देखील सदर अभियान शिबीराबाबत प्रसिध्दी देण्यात यावी अशी सूचना दिली आहे. 
           हया शिबिरामध्ये उपस्थित राहणेविषयी  खासदार, आमदार  यांना देखील विनंती करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांचे गावाचे सरपंच यांचेशी स्वत: संपर्क साधून, सदरचे समाधान शिबिर यशस्वी करावे असे सहायक जिल्हाधिकारी किनवट यांनी देखील निर्देश दिलेले आहेत.   वरील शिबिरामध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, दुय्यम निबंधक, उपअधिक्षक भुमी अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, जलसंधारण अधिकारी, व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सर्व पोलीस पाटील, सर्व अंगणवाडी कर्मचारी आणि सर्व सेतु केंद्र चालक यांना उपस्थित राहून, त्यांचे विभागांच्या योजनांची माहिती लोकांना देवून, संबंधित महसूल मंडळातील जनतेला त्यांचे विभागाव्दारा राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ देणेसाठी त्यांनी नियोजित दिनांकास शिबिराचे ठिकाणी उपस्थित राहून, एकल खिडकीव्दारे जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करणेविषयी व शिबिराचे आयोजन यशस्वी करणेसाठी सर्व विभागप्रमुखांना कळविण्यात आले असल्याची माहिती माहूर चे तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या