Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.चंद्रशेखर चकोले यांना पीएच.डी.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- स्थानिक बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथील सहयोगी प्रा. डॉ. चंद्रशेखर महादेव चकोले यांना फार्मास्युटिकल सायन्स या विषयांमध्ये पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. ही पदवी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या दीक्षांत समारंभात दिल्लीचे उपराज्यपाल व कुलगुरू विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ. चंद्रशेखर चकोले यांनी दिल्ली फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च युनिव्हर्सिटी नवी दिल्ली येथील भारताचे पहिले फार्मसी विद्यापीठ असून त्यांनी डॉ. मीनाक्षी कंवर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदकडून फेलोशिप प्राप्त झालेली होती. त्यांनी " ग्लाकोमा व्यवस्थापनासाठी नॅनोलिपिड कॅरिअर-आधारित ऑक्यूलर जेल प्रणाली " विकसित करण्यावर संशोधन केले होते. या यशाबद्दल त्यांनी वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर यांना दिलेले असून सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आतिश शहारे, व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. लोकानंद नवखरे, महाविद्यालयातील समस्त सहयोगी प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या