चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : ठाणे जिल्ह्यातील ओम साई शिक्षण संस्था संचलित एस.एम.जी विद्यामंदिर दिवा पूर्व या शाळेतील शिक्षक संदिप अनंत वाघेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी पुणे येथे ध्येय फाउंडेशन एज्युकेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. संदिप वाघेरे यांनी तब्बल 17 वर्ष शिक्षण क्षेत्रात निष्ठेने सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले.
आता पर्यंत दोन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व एक हिंदी प्रचारक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षक म्हणूनच त्यांनी केवळ अध्यापनच नव्हे तर प्रशासकीय कौशल्य, तालुकास्तरीय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकाची भूमिका बजावत आहे.
मुंबई हिंदी सभा या संस्थेचे 16 वर्ष निष्ठावान प्रचारक म्हणून कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवोपक्रम करत आहे.बाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग समाविष्ट करून विशिष्ट यश संपादन करण्यास मोलाची भूमिका बजावली आहे. जिल्हास्तरीय निबंध व वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा व स्वतःही विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून राज्यस्तरीय उज्वल यश संपादन केले आहे. शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन समाजासाठी प्रभावी योगदान देत आहेत विविध दिव्यांगांना दिव्यांग सर्टिफिकेट, शासकीय योजना, व यु डी आय डी कार्ड संबंधित माहिती देऊन त्यांना मदत करणे, विविध अंकात, ई-साहित्यात लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. रेडिओ पुणेरी आवाज FM 107.8 वर विविध कवितेचे वाचन झाले आहे.भजन, गायन, वकृत्व, नाटक यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवलेले आहेत.


0 टिप्पण्या