Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.राजश्री पाटील यांना काव्यगंध साहित्य समूहाचा पुरस्कार बहाल



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या 'काव्यगंध साहित्य समूहा'च्या वतीने नुकताच गौरव सोहळा पार पडला. यात सुरत येथील नामवंत कवयित्री आणि लेखिका प्रा. राजश्री पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य सेवेबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल समूहाचे अतिशय देखणे व आकर्षक 'सन्मानचिन्ह' देऊन गौरविण्यात आले.

  काव्यगंध समूहाचे मार्गदर्शक प्रशांत आणि अक्षशीला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. समूहाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि निस्वार्थी समर्पणामुळे अनेक लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे.

  आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. राजश्री पाटील म्हणाल्या की, "हे सन्मानचिन्ह केवळ एक प्रतीक नसून माझ्या लेखणीला मिळालेली ही एक मोठी पोचपावती आहे. या गौरवामुळे लेखणीला नवी उभारी मिळाली असून, याबद्दल मी समूहाचे मनापासून आभार मानते." या यशाबद्दल त्यांचे साहित्यिक वर्तुळातून कौतुक होत आहे.
प्रा.राजश्री पाटील ह्या मनस्वी महिला व्हाॅट्सअप गृपच्या एक मुख्य मार्गदर्शिका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या