Ticker

6/recent/ticker-posts

गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी यांना निलंबित करा


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमची मागणी 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-तक्रारकर्त्याची गोपनीय क्लिप व्हायरल केल्यामुळे शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम सामाजिक संघटना भंडारा यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. " परीक्षा केंद्राच्या नावावर विद्यार्थ्यांना लॉलीपॉप "  हे वृत्त प्रसिद्धी माध्यमात प्रकाशित होताच साकोली तालुक्यातील पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांविषयी आपला रोष व्यक्त केला आहे. तक्रारकर्त्याची क्लिप जर शिक्षणधिकारी व्हायरल करीत असतील तर पालकांनी तक्रारी करायच्या कशा असा संतप्त सवाल पालकांनी व्यक्त केला आहे. आर्थिक देवाणघेवीतून क्लिप व्हायरल करणाऱ्या भंडारा शिक्षणधिकारी आणि साकोली गटशिक्षणधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. साकोली तालुक्यात शालांत परीक्षा सुरू असतांना परीक्षा केंद्रावर कॉफी चालत असल्याची तक्रार करण्यात आलेली होती. काही केंद्राची नावे सुद्धा तक्रारकर्त्यांनी दिली. मात्र या तक्रारीची दखल घेण्याऐवजी तक्रार कर्त्याची क्लिप साकोली गटशिक्षणधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. गटशिक्षणधिकारी यांच्या देखरेखित तालुक्यातील शालांत परीक्षा पार पडत असतात. परंतु वरिष्ठांनी पाठवलेली तक्रारकर्त्याची क्लिप गटशिक्षधिकारी यांनी कारवाई करण्याऐवजी चक्क केंद्रप्रमुख आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना ही क्लिप व्हायरल केली. वास्तविकता या क्लिपचा आधार घेऊन परीक्षा केंद्रावर रेड मारायला हवी होती. पण खाजगी शाळांचे मांडलिक असलेल्या शिक्षण विभागाने या क्लिपच्याच नावावर आर्थिक धंदा केल्याची माहिती आता समोर येत आहे.
प्रसिद्धी माध्यमाच्या हातात अनेक परीक्षा केंद्राचे कॉपी अभियान गवसल्याचे पुरावे आता समोर आल्याने शिक्षण विभाग सावरसावर करू लागलेला आहे. परंतु हे पुरावे प्रसिद्धी माध्यमानी शिक्षण उपायुक्त यांच्या नजरेस आणून दिल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी आता गोत्यात आलेले आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असतांनाही कॉपी चालत असेल तर परीक्षा केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणधिकारी यांच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तक्रारकर्त्याची गोपनीय तक्रार भंग केल्याप्रकरणी भंडारा शिक्षणाधिकारी आणि साकोली पंचायत समितीचे गटशिक्षणधिकारी यांना निलंबित करा या मागणीला सर्व स्तरातून जोर आला असून कारवाई न केल्यास समोरचा मार्ग निवडणार असल्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम सामाजिक संघटना भंडारा यांनी केलेली आहे. 
_______________________________________________

तक्रारकर्ता कुणीही असो. त्याची तक्रार गोपनीय ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करायची असते. मात्र भंडारा शिक्षण अधिकाऱ्याचा हा अफलातून प्रकार संतापजनक आहे. तक्रार कर्त्याची तक्रार आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्याऐवजी क्लिप व्हायरल करणे हा बेशिस्तपणा आणि बेजबादारपणा आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून असे अपेक्षित नाही. एका वरिष्ठ शिक्षणधीकाऱ्याला याची जाणीव नसेल तर त्यांना शासनाने खुर्चीवर बसवून ठेवण्याचा अधिकार नाही. अशा बेजबाबदार शिक्षण अधिकाऱ्याची खुर्ची वेळीच खाली करायला लावणे  महत्त्वाचे आहे. या प्रकरणात साकोलीचे गट शिक्षणधिकारी तेवढेच जबाबदार आहेत. या प्रकरणी दोघाही शिक्षणधिकार्‍यावर कारवाई न झाल्यास आम्ही समोरचे पाऊल उचलू. 

कैलास गेडाम, महासचिव. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम सामाजिक संघटना भंडारा.
______________________________________________

या प्रकरण संदर्भात उघडकीस आलेल्या प्रकार निश्चित संतापजनक तथा निंदनीय आहे. तक्रारीची क्लिप अशी बेजबादारपणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हायरल करून, केंद्रप्रमुख आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना ऐकवली जात असेल तर नक्कीच यात आर्थिक देवानघेविचा प्रकार दिसून येतो. तक्रार कर्त्याच्या तक्रारीत ज्या ज्या केंद्राची नावे उघड झाली त्या केंद्राकडून आर्थिक लाभ करून घेतल्याची शक्यताच नाकारता येत नाही. कारण ही क्लिप व्हायरल करण्याचा उद्देशच हा असावा. नागपूर शिक्षण उपयुक्त यांनी दोघाही शिक्षणधिकार्‍यावर कारवाई करावी. जिथपर्यंत कारवाई होत नाही तिथपर्यंत प्रसिद्धीमाध्यमसुद्धा चूप बसणार नाही. 
 
रवि भोंगाने, पालक.
तथा प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी, साकोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या