सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड शहरातील नुरानी कॉलनी रस्ता परिसरात भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली असून गावगुंड सागर मोहळकर याच्यावर अज्ञातांनी जवळून गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सागर मोहळकर याच्यावर जवळून ३ ते ४ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोहळकर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीसांकडून तपास सुरू आहे. सागर मोहळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. वर्षभरापूर्वी जामखेड पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते, अशी माहिती समोर येत आहे.शहरात व तालुक्यात त्याच्या त्रासदायक कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे येत नसल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


0 टिप्पण्या