Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या समाधान शिबिरात जनतेचे झाले समाधान!!

उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांचे मार्गदर्शन..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-येथील शंकर-पार्वती मंगल कार्यालयात छञपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा क्र.१ निमित्ताने आयोजित समाधान शिबिर दि.१४ रोजी संपन्न झाले.
या शिबिरात उपस्थितांना उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे,तहसीलदार राम बोरगावकर यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.तसेच या शिबिरात हाळी,हंडरगुळी, आनंदवाडी,मोरतळवाडी, सुकणी,चिमाचीवाडी सह आसपासच्या गावातुन आलेले शेतकरी,मजुर,जेष्ठ, अपंग व लाडक्या बहिणी यांना आवश्यक ती माहिती व प्रमाणपञ मिळाल्यामुळे सर्वांच्याच चेह-यावर हास्य व समाधान दिसत होते.
तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे,
तहसीलदाररामबोरगावकर,ना.तहसीलदार राजश्री भोसले,पं.स.उपसभापती विक्की भोसले,चेअरमन संग्राम भोसले,पं.स.माजी सभापती संगम अष्टूरे,माजी उपसरपंच राजू पाटील, अन्न.पुरवठा निरीक्षक सुमिञा ईलमले,स.पो.निरिक्षक सुनील गायकवाड,जमादार संजय दळवे,शिवप्रताप रंगवाळ, जमाबंदी निरिक्षक सुडे,महसुल मंडळ अधिकारी मिनाक्षी शिंदे,ग्राविअ.एस.आर. कांबळे,चंद्रशेखर बिडवई,
तलाठी प्रशांत बिराजदार, तलाठी तानाजी शिंदे,खरेदी विक्री संघाचे संचालक मुळे विठ्ठल,शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सर्जेराव भांगे,
सचीन,माचेवाड,भालेराव नंदू यांच्यासह आरोग्य,वीज  क्रषी,महसूल,पाटबंधारे,
अंगणवाडी खात्याचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या