Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-हंडरगुळी येथील प्रा.आ.केंद्रात नुतन जि.प.सदस्य रामभाऊ तिरुके यांच्या अध्यक्षतेत दि.२० रोजी रुग्ण कल्याण समितीची बैठक पार पडली आगामी काळात आरोग्य सुविधा मजबूत होण्यासाठी तसेच CHO व आशाताईंचे प्रश्न सोडविण्यासाठी आणी हंडरगुळीसाठी परमानंट वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असून डाॅक्टर व कर्मचारी यांनी आरोग्यदूत बनून सेवा द्यावी.कामचुकारपणा करु नये.तसेच रुग्णांची तक्रार निवारण्यासाठी तक्रार पेटी बसवावी.असे या प्रसंगी बोलताना रामभाऊ तिरुके यांनी सांगीतले.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी हेर व लोहारा जि.प गटाचे रा.काॅं.व इं.काॅं.च्या सदस्यांसह,उपसभापती विक्की भोसले-पाटील,पंस सदस्या सौ.सुरेखाताई भांगे संतोष बिरादार,उत्तमराव देशमुख,संग्राम भोसले,राजु पाटील,कल्याण माने,भांगे सर्जेराव,मकदूम शेख,डाॅ. स्वप्निल काळवणे,डाॅ.विष्णू गायकवाड,चिल्लरगे,गुणालेसुळे,ग्रापं.प्रशासक विजय अंबेकर,दयानंद कांबळे सह आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या मोठ्यासंख्येंनी उपस्थित होते.
तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे या केंद्रातर्फे शाल व पुष्प देऊन स्वागत करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या