Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती रत्नप्रभादेवी गृह विज्ञान महिला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे उपस्थित होते.या कार्यक्रमात रत्नाई महोत्सवा दरम्यान क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.
             रत्नाई महोत्सव निमित्त महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यामध्ये कु.प्रणाली माने हीस कबड्डी या खेळ प्रकारात विद्यापीठ संघाकडून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग,कु.ईश्वरी कोतमिरे, कु.सोनाली राजेंद्र वाघमोडे,कु. साक्षी दांगट,कु.किरण पवार,कु. संस्कृती गांधी,कु.परजणी जाधव, कु.गौरी सरगर व कु.शिवानी कांबळे यांचा रस्सीखेच स्पर्धेत आंतरमहाविद्यालयीन स्तरावर सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल सन्मान करण्यात आला तर लेझीम, खो-खो,व्हॅालीबॅाल,क्रिकेट,धावणे, गोळाफेक इ.स्पर्धांमध्ये यशस्वी खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.
                  रत्नाई महोत्सवात नृत्य स्पर्धा,फॅशन शो व बेस्ट एसआरएमपियन अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. संस्कृती गांधी विद्यार्थिनीने पटकावला तर द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी मोळे विद्यार्थिनीने पटकावला.युगल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक कु.भाग्यश्री माने-देशमुख आणि कु.ईश्वरी कोतमिरे विद्यार्थिनींनी पटकावला तर द्वितीय क्रमांक कु.प्रगती शेटे आणि कु.अबोली सवळे या विद्यार्थिनींना मिळाला.समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक गृह विज्ञानाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीच्या संघाने पटकावला तर द्वितीय क्रमांक द्वितीय वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी पटकावला.फॅशन शो या स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय वर्षाच्या गृह विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी पटकावला तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक गृह विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी पटकावला.  रत्नाई महोत्सवातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे बेस्ट एस आरएमपीएन ऑफ द इयर!. या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी भाग घेतला पण सरते शेवटी अंतिम फेरीपर्यंत केवळ तीन विद्यार्थिनी पोचल्या आणि त्यातून कु.प्रगती शेटे या विद्यार्थिनी उपविजेती ठरली तर या स्पर्धेची विजेती कु.प्रीती व्यवहारे ही विद्यार्थिनी ठरली. 
          या कार्यक्रमाची प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे यांनी करून देताना वर्षभरातील क्रीडा,सांस्कृतिक कला आणि सृजन तसेच शैक्षणिक क्षेत्रात  महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केलेल्या कामगिरीचा आढावा सादर केला आणि सदरील यश महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शना खाली खेचून आणण्यात यश प्राप्त झाले असे प्रतिपादित केले.
           या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित प्रमुख पाहुणे अभिजीत रणवरे  यांनी विद्यार्थिनींना रत्नाई संकुलात उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधांचा उपयोग सर्वांगीण विकासासाठी करून घ्यावा असे आवाहन केले आणि संस्था सदैवच विद्यार्थिनीच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असते आणि सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास अग्रेसर असते असे प्रतिपादित केले.अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमित घाडगे यांनी संस्थेच्या सबळ पाठिंब्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असूनही सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाचे आणि संस्थेचे नाव उज्वल करत आहेत असे प्रतिपादित केले.महाविद्यालय सततच बदलत्या काळाची पाऊले ओळखून संस्थेच्या पाठिंब्यातून स्वतःमध्ये बदल करून विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील जगातील आव्हानांसाठी तयार करत असते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख अरविंद वाघमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अमृता मगर आणि कु.नेहा गायकवाड या विद्यार्थिनींनी केले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग,डॉ.राजश्री निंभोरकर,डॉ. भारती भोसले,डॉ.जयश्रीला मनोहर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि कार्यालयीन सहकारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग आपल्या पाल्यांचा बक्षीस वितरणाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या