Ticker

6/recent/ticker-posts

जुन्या कामगारांना तातडीने पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश आ. सुधिर मुनगंटीवार यांनी वेकोली प्रशासनाला दिले


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी एकोणा माईन्स (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) येथे आठ महिन्यांपासून कामापासून दूर ठेवलेल्या स्थानिक कामगारांच्या डोळ्यातील वेदना लक्षात घेत, त्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आयोजित बैठकीत स्पष्ट निर्देश दिले.
कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणे अत्यंत वेदनादायक असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी बैठकीत नमुद केले.हा केवळ रोजगाराचा नाही, तर कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न असल्याचे स्पष्ट करत, या अन्यायाला पूर्णविराम देण्यासाठी सर्व जुन्या कामगारांना तातडीने पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश कंपनी व वेकोली प्रशासनाला त्यांनी आज दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या