ग्राहक पंचायत महाराष्ट्र व तहसिल कार्यालय भद्रावतीचे आयोजन
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : जिल्हा परिषद तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय भद्रावती येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावती तसेच तहसिल कार्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक हक्क, जबाबदाऱ्या आणि जागृती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार राजेश भांडारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी बंडू आकनुरवार उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका गावंडे, निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे, पुरवठा निरीक्षक वैभव सोळंके, रती मस्के, केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे भद्रावती तालुकाध्यक्ष प्रविण चिमुरकर, सचिव वतन लोणे, तसेच बालाजी दांडेकर, बाळा कुटेमाटे, रामचंद्र दिगदैतुलवार आणि विकास दुर्योधन उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती देत विद्यार्थ्यांना जागरूक ग्राहक बनण्याचे आवाहन केले. आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे, फसवणुकीपासून बचाव करणे आणि ग्राहक म्हणून आपले अधिकार जाणून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्य मार्गावरून ग्राहक जागृतीचे फलक हातात घेऊन रॅली काढली. या रॅलीद्वारे नागरिकांना ग्राहक हक्कांविषयी जागरूक करण्यात आले. नगरपरिदेच्या आवारात पोहोचताच नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी पुष्पगुच्छ देत रॅलीचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन विनोद ठमके यांनी केले तर आभारप्रदर्शन सोनल वावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारत खोब्रागडे, करूणा मोघे, प्रतिक्षा बनकर, गुरूदेव बावणे तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या