तातडीने वाद मिटून न्याय मिळाल्याने शेतकरी आनंदी !
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर- तालुक्यातील मौजे मुरली येथील शेतकरी जीवन नारायण शिंदे व प्रकाश नारायण शिंदे यांच्या मालकी व ताब्यातील मौजे मुरली येथील गट क्र.१६६ शेतात बैलगाडीने ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी तहसील कार्यालय माहूर यांचेकडे मौजे मुरली येथील गट क्र. १६५ व १८१ मधून बैलगाडी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप व मुरली सज्जाचे तलाठी साहेबराव गावंडे यांनी दि.२४ रोजी जायमोक्यावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व गट क्र. १६५ व १८१ चे मालक व ताबेदार कमलाबाई बाबाराव सूर्यवंशी व साहेबराव माधवराव सूर्यवंशी यांचे समुपदेशन करून जीवन शिंदे व प्रकाश शिंदे यांच्या मालकी च्या शेतात बैलगाडीने ये-जा करण्यासाठी व गट क्र. १६५ व १८१ चे मालक व ताबेदार यांनी संमती दिल्याने रस्त्यासंबधीचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वाद निकाली काढला. बैलगाडी रस्ता दिल्या नंतर दोन्ही पार्टीने एकमेकाविरुद्ध न्यायालयात दाखल असलेले खटले मागे घेण्याचे कबूल केले. दरम्यान गट क्र. १६५,१६६, १८१ ची सर्वांच्या संमतीने उपअधीक्ष भूमी अभिलेख माहूर यांचेकडून मोजणी करून घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी कमलाबाई सूर्यवंशी, बाबाराव सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी जीवन शिंदे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते. अनेक दिवसाचा वाद तातडीने मिटल्याने शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.


0 टिप्पण्या