वंदना बरडे आज पर्यंत ठरल्या अनेक सन्मान पुरस्कारांच्या मानकरी!
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक जेष्ठ सदस्य वंदना बरडे! त्यांचे मुळ वास्तव्य विदर्भातील नागपूर! सध्या त्या उपजिल्हा वरोरा रुग्णालयात अधिसेविका म्हणून आपलं कर्तव्य इमानेइतबारे पार पाडत आहेत.
आरोग्य सेवेत असताना देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
हाती घेतलेले काम वेळीच पूर्ण करायच परत नविन काम हाती घ्यायच याच धोरणामुळे त्या आरोग्य सेवेत आज लोकप्रिय ठरल्या आहेत.
काम करीत असताना त्यांच्या समोर अनेक संकटे उभी ठाकली पण आरोग्यसेवेतील त्यांचा अनुभव दांडगा असल्यामुळे त्यांनी सहजरित्या या आलेल्या संकटावर मात केली.
अधिकारी व कर्मचारी वर्गांशी त्यांचे आजही निकटचे मधूर व गोड संबंध राहिले आहे.अल्पकालावधीत त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला आहे.हे विशेष!
आज सहज सुचलं परिवारात येवून त्यांना बरेच वर्ष झाली.त्यांनी नेहमीच मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे, संयोजिका रंज्जू दिलीप मोडक,व सहसंयोजिका नलिनी दिनेश आडपवार यांचा आदर व सन्मान केला आहे.
सहज सुचलं हा खरोखरच समाजातील महिलांना प्रोत्साहन देणारा एकमेव महिला व्हाॅट्सअप गृप असल्याची प्रतिक्रिया या पूर्वीच त्यांनी नागपूर मुक्कामी दिली आहे.
आज त्यांचा वाढदिवस असून त्यांना सहज सुचलं टीम कडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा व शुभकामना!


0 टिप्पण्या