चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन न्यू दिल्ली, चंद्रपूर जिल्हा प्रवक्तापदी शहरातील परब विशाल गिरडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे विद्यार्थी नेते परब गिरडकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात अमाप लोकप्रिय असलेले विद्यार्थी नेते परब गिरडकर हे सध्या स्थानिक शांताराम पोटदुखे महाविद्यालयात एलएलबीचे शिक्षण पूर्ण करीत आहेत.गिरडकर यांचे सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसोबतच राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांमंडळींशी अतिशय निकटचे संबंध आहे.
गिरडकर यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या चंद्रपूर जिल्हा प्रवक्तापदी नियुक्ती झाल्याबद्दल समाजसेविका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, सुनिल रामटेके, रंज्जू दिलीप मोडक, नलिनी आडपवार, दत्तात्रय समर्थ, गौतम तोडे, चंदू राऊत यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या