Ticker

6/recent/ticker-posts

भाई विजय शिनगारे यांची आझाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा/ छत्रपती संभाजीनगर : आझाद समाज पार्टी (ASP) चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार भाई अँड. चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते भाई विजय शिनगारे यांची ASP जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड दिनांक 12 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष मनीषजी साठे व प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुमितजी साबळे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे सर यांच्या नेतृत्वात विजय शिनगारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आझाद समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.

या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 युवा जिल्हाध्यक्ष अनामी मोरे (ASP), परभणीचे नेते सुभाष वाव्हाळे, विकास वाव्हळ, त्रिशरण गायकवाड, युवा नेते सचिन निसर्गन, बाळू शेजवळ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या