Ticker

6/recent/ticker-posts

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान



चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूरातील स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

या  कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर या उपस्थीत होत्या.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 
 त्यानंतर मीनाक्षी रोहनकर, उज्वला करडभाजने, रंजना माणूसमारे, ममता गटलेवार, ज्योती भेंडाळे, आशाताई झिंगरे, पुष्पांजली सोनुले,व दिपाली रोहनकर यांनी  मधुर आवाजात स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली .  
प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती   जया चंदावार ,आणि रेखा श्रीपूरवार  या प्रामुख्याने उपस्थित होत्या.या शिवाय या आयोजित कार्यक्रमाला वनश्री मेश्राम , जगदीश लोणकर , दिलीप वावारे , स्मीता  रेभनकर ,नसरीन शेख,छबू वैरागडे, शोभा निरंजने, व मेघा मावळे यांची उपस्थिती लाभली होती.
 वनश्री मेश्राम यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सुवर्णा विजय लोखंडे यांनी केले.  सर्व स्तरावरील महिलांना एक व्यासपीठ मिळवून देणे व त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणे हाच या कार्यक्रमाचा मुळ उद्देश असून तो गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अतिशय उत्तम रित्या पार पडत आहे असे सुवर्णा लोखंडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणाततून सांगितले.
वृषाली राजेश धर्मपुरीवार यांनी महिला दिनाचा उद्देश म्हणजे महिला ही समाजाचा व घराचा मुख्य पाया आहे .ती समाजातील व घरातील सुसंस्कार व संस्कृतीची  जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकते .  
  मातृत्व वस्तीस्थर संस्था यांच्या नेतृत्वाखाली बचत गटाच्या माध्यमातून तुकूम येथील कार्यक्रम स्थळी अनेक खाद्यपदार्थांचे व कलाकृतीचे स्टॉल लावण्यात आले होते.ज्या माध्यमातून सर्वसाधारण महिलांच्या उद्योगाला व तिच्यात असलेल्या कला कौशल्येला वाव मिळेल या सार्थकी उद्देशाने स्टाॅल लावण्याची संधी मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली होती.
  महिलांनी सुरेख व सुंदर असे नृत्य सादर करून सर्व प्रेक्षकांचा या वेळी आनंद द्विगुणीत केला. तद्वतच 
 कलावंतांना बक्षीसे देऊन या वेळी गौरविण्यात आले. 
विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सर्व महिलांचा वृक्ष व कुंडी देऊन सत्कार करण्यात आला. 
 कार्यक्रमात अपर्णा चिडे, प्रतिभा रोकडे, ज्योती नामेवार, कविता वरभे, माधुरी बोडेकर , ममता गटलेवार, ज्योती भंडाळे, लता ढोके, छाया ढोके,निमकर ताई, ज्योती राऊत, सुजाता राजुरलेवार, रोशनी कापसे,निलीमा पाटील, भारती राऊत, ज्येष्ठ कार्यकर्त्या मोसमवार ,खोडे संगीता लोखंडे यांच्याकडून लकी ड्राॅ च्या माध्यमातून सुंदर अशी पैठणी आयोजित करण्यात आली होती. ज्याची विजेता चेतना राऊत ही ठरली.  सदरहू कार्यक्रमाला प्रभागातील महिला मंडळ , रेणुका माता योग मंडळ, स्वरांकित भजन मंडळ, लॉ कॉलेज योगा मंडळ, शिवमंदिर योगा ग्रुप, साई मंदिर योगा ग्रुप, छत्रपती नगर भजन मंडळ, तसेच स्वामी समर्थ महिला मंडळ, योगा ग्रुप, बचत गट, जेष्ठ नागरिक संघ, कुल निर्माण संस्था व वार्डातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्तंपणे प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन किर्ती ठाकुर व वृशाली धर्मपुरीवार  यांनी केले.
 एकंदरीत सर्वांच्या स्मरणात राहील असाच एकंदरीत महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या