विजेच्या जुन्या खांबावर शादीखान्याचे अतिक्रमण!! ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप.
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-उदगीर तालुक्यातील पं.स.उपसभापतींचे गावात अन् गल्लीत रस्त्यावरच वीजेचा नवीन खांब उभा करण्यात आला असल्याने गावकरी मंडळीतुन तीव्र संताप व्यक्त केला जात असून जुना खांब जेथे आहे,तेथेच नवीन खांब उभा करावा.व जुन्या खांबावरील अतिक्रमण दुर करावे,अन्यथा कायदेशीर आंदोलन करण्याच्या तयारीत महिला-पुरुष दिसतात.
हंडरगुळी येथील बाजार (पाटील) गल्लीत वीजेचा १ खुप जुना खांब नालीच्या कडेला उभा आहे.हा खांब जुना जरी झाला असलातरी ही आजही मजबुत दिसतो. पण हा जुना खांब लगतच सुरु असलेल्या शादीखान्या च्या संरक्षक भिंतीमध्ये घेत त्यावर संबंधितांनी ग्रापं.च्या मदतीने अतिक्रमन केले.
अशा प्रकारे शासनाची वस्तू तथा मालमत्ता शादीखान्या सारख्या प्रायव्हेट यंञणेला ताब्यात घेता येते का?येत नसेलतर शादीखान्याच्या अतिक्रमणामध्ये जाणुन- बुजून घेतलेला जुना खांब पुर्वीप्रमाणेच अतिक्रमण मुक्त करण्याची धमक ग्रापं. चे प्रशासकीय मंडळ दाखवेल का?
१५ते२० फुट उंचीच्या मुर्ती ट्रॅक्टर मध्ये बसवून गणेश विसर्जन दिनी गावातील १०,१२ मंडळाचे तसेच नवराञ उत्सवाचे वाहने व हजारो भक्त वाजत-गाजत याच बाजार गल्ली मधून जातात.आणि ही परंपरा पुर्वापार चालत आहे.तसेच येथे गणपतीच्या १५ते२० फुटांच्या मुर्ती बसवितात.हे सर्वकांही माहिती असून ही भररोडवर गरज नसताना नवीन खांब उभा करण्याचा परवाना ग्रापं.ने विशिष्ट लोकांना खुष करण्यासाठी दिला असे बोलले जाते. माञ,हा नवीन खांब काढून जुना खांब कंपाऊंड भिंती च्या अतिक्रमणातुन मुक्त नाही केल्यास गावातील सामाजिक सौहार्द कधी ही धोक्यात येऊ शकते..!
तसेच ग्रापं.तर्फे दाखवले त्या पाॅईंटवर गरज नसताना सुध्दा आम्ही पोल उभा केलो.तेंव्हा प्रशासनाने लेखी दिल्यास नवा व जुना पोल हटविण्या येईल.अशी माहिती १ लाईनमनने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे.
जुना पोल मजबूत असूनही नवा पोल तो पण रोडवर उभारायची गरजच काय? असा सवाल माजी सरपंच शिवाजीराव भोसले यांनी आमच्याशी बोलताना ग्रापं. ला विचारला आहे.
या गल्लीत तसेच गावात विविध ठिकाणी गणपती व देवीची स्थापना होते.त्या सर्वांच्या मोठमोठ्या मुर्तींची मिरवणुकीसह अन्य वाहने (ट्रक,ट्रॅक्टर,जेसीबी,डंपर) याच गल्लीतुन जातात.अन् याची माहिती असून सुध्दा संबंधितांनी रोडवर नवीन खांब उभा का?केला.अशी विचारणा माजी उपसरपंच तथा प्रशासकीय सदस्याला करत असताना ग्रा.पं.च्या एका माजी महिला सदस्या च्या मुजोर पोराने माझ्याशी अरेरावी केली.माञ,गावात पुर्वापार असलेली शांती कायम असावी,म्हणुन ग्रापं.शी कसलाच संबंध नसलेल्या त्या मुजोर पोरा सोबत मी सौहार्दानेच वागलो.माञ,ग्रामपंचायतचे प्रशासकीय मंडळाने रोडवर उभारलेला नवा पोल तेथून काढावा.तसेच कंपाउंड भिंतीच्या अतिक्रमणात अक्वायर (बंदीस्त) करुन घेतलेला जुना पोल मोकळा करावा.आणि प्रशासकीय मंडळाने मर्दूमकी दाखवावी असे शेतकरी दयानंद शेळके म्हणाले.
मतांच्या लालचीपायी गत ५ वर्षापासून विशिष्ठ मंडळींचे लांगुनचालन करणा-यांनी कंपाउंड भिंतीतील जुना सुस्थितीतला खांब मोकळा करावा.अन्यथा होणा-या तीव्र उद्रेकास ग्रापं.प्रशासक मंडळ जबाबदार असेल. याची नोंद संबंधितांनी घ्यावी.असे मत ग्रापं.माजी सदस्य धनंजय काळवणे यांनी व्यक्त केले.
हजारो भक्तांच्या उपस्थिती मध्ये २०,२० फुटांच्या गणेश मुर्तींच्या विसर्जन मिरवणुका व अन्य वाहने जाणा-या गल्लीत रोडवरच खांब उभारणे चुकीचे आहे. लेखी तक्रार आल्यास नवा व जुना खांब मोकळा करा. असे पञ संबंधितांना दिले जाईल.अशी माहिती ग्रा.पं. अधिकारी एस.आर.कांबळे यांनी दिली.


0 टिप्पण्या