Ticker

6/recent/ticker-posts

काटोल येथे महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती हर्षोऊल्हासात साजरी.



चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : जिल्ह्यातील काटोल शहरांमध्ये 
 दि ११ एप्रिल ते १८ एप्रिल2026 पर्यंत काटोल येथे ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.14  एप्रिल ला  सकाळी  9 वाजता काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकुर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काटोलचे नगराध्क्षा अर्चना  राहुल  देशमुख व सर्व नगरसेवक व नगरसेविका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुप्षमाला अर्पण करून सामुहिक बुध्द वंदना घेवुन अभिवादन केले.तसेच त्रिरत्न महिला मंडळच्या अध्यक्षा मीनाताई पाटील अध्यक्षतेखाली महिलांनी स्कुटर रॅली काढण्यात आली.पंचशील बुध्द विहार रेल्वे स्टेशन पासून ते भीम चौक ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅली हत्तीखाना येथील करूणा बुध्द विहार,पेठ बुधवार येथील प्रज्ञा बुध्द विहार, जेवण बुध्द विहार आय यु डि पी झेंडा समिती येथील संपूर्ण विहाराला भेट दिली व अभिवादन करून  पंचशील बुध्द विहार येथे स्कुटर रॅलीचे समापन झाले . 
आणी काहि तांत्रीक कारणा मुळे सार्वजनिक भव्य रॅली हि अगदी वेळेवर कळले कि रॅली रद्द झाली रॅली ला अगदी थोडाच वेळ बाकी राहिलेला असतांना आम्हा महिलांना वाटले कि पोलीस परमिशन नसेल म्हणून आम्ही म्हणजे  त्रिरत्न महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना पाटील,कला साधक च्या वर्षा गजबे, कविता मडके, प्रतिभा पाटील, अनिता नाईक, आश्या मेंढे, जोशना धवराळ, जया धवराळ, रोशनी सोमकुवर , आम्ही काटोल पोलीस स्टेशन ला गेलो आणी पोलीस निरीक्षक साहेबांना रॅली बद्दल विचारना  केली असता त्यांनी रॅली ला परमिशन दिलेलीच  आहे.बोलले  आणी  आम्ही पोलिसस्टेशन च्या बाहेर आल्यावर  मीना पाटील यांनी रॅली काढा  असा मी व्हिडिओ सेन्ड  केला. व सामाजिक कार्यकर्ते यांना फोन केले एका तासामधे  ५ ते ६ च्या दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.आणी काटोल मधे दर वर्षी प्रमाणे भव्य  रॅली काढण्यात आली.आणी एक वर्षापासून अनेक भिम अनुयायी  आनंदात असतात,प्रत्येक विहारातुन झाकि काढतात आणी एकत्रीत येवुन भव्य रॅलीचा आनंद घेतात  सर्वांच्या चेहर्यावर आनंद हि आनंद दिसत होता .महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले'' शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,जो प्राशन करेल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही. पण शिक्षण घेवुन एकमेकांवर घुरघुरू नका व एकमेकांची दिशाभूल करू नका  शिक्षण प्रत्येकांनी प्राशन केलेच पाहिजे त्याचबरोबर धम्माच्या नितीने चालले पाहिजे असे मीनाताई पाटील यांनी आपल्या प्रबोधनातुन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या भव्य रॅली मधे " भिमकन्या  लेझीम ग्रुप"  पथक एक आकर्षक होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या