चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- शेतकरी आणि ग्रामीण विकासाच्या मुख्य आधार असलेल्या पांदन रस्त्याच्या कामांना जिल्हात गती मिळत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी काल 23 एप्रिल रोजी मातोश्री पांदन रस्त्याची मौजा डव्वा ता. भंडारा व मौजा पालांदूर ता. लाखनी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी केली. मातोश्री पांदन रस्त्यामधून पांदन रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण केले जात असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. भंडारा व लाखनी तालुक्यातील ज्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे अशी सर्व कामे पावसाळ्यापूर्वी भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनास व सबंधित
यंत्रणेनी करावे असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले..
पावसाळ्यात चिखल आणि खड्यामुळे शेतकरी यांची होणारी ओढतान या कामांमुळे कमी होणार आहे. सदर विषय हा शेतकरी यांचा जिव्हाळ्याचा असून तहसीलदार व यंत्रणेचे अधिकारी यांनी काम सुरु असताना कामावर भेटी देण्याबाबत तसेच कामे टिकाऊ व गुणवत्तापूर्वक होण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
त्यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी डव्वा व पालंदूर येथिल शेतकऱ्यांचे या विषयी समाधान
आणि मत ऐकून घेतले. तसेच पालंदुर येथील उपस्थित मजुरांशी संवाद साधला.
त्यावेळी पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ होतील व मंजूर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण
होतील याचे नियोजन करावे अशा महत्वपूर्ण सूचना दिल्या.
जिल्हाधिका-यांच्या या भेटीमुळे तहसीलदार आणि यंत्रणा यांना निश्चितच प्रेरणा आणि कामाची दिशा
मिळून त्यांचा आणि ग्रामस्थांचाही उत्साह वाढला आहे.


0 टिप्पण्या