Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी. बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादरीकरण .

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर  : बुधवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी,दिक्षाभूमी बौद्ध सांस्कृतिक कार्यक्रम व साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  अण्णाभाऊ साठे चौक दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीच्या निमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी किशोर बेहाडे,आणि वसंत फुलझेले यांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्ल्यार्पण करण्यात आल्या ज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली  संlस्कृतिक कार्यक्रम अविनाश दुपारे आणि संच यांची प्रस्तुती होती.  
                 कार्यक्रमात देवा वानखेडे यांनी मंच संचालन केले आणि डॉ बाबासाहेबांचे दुर्मिळ अनुभव सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बौद्ध सांसृतिक कार्यक्रमात कलावतांनि एकापेक्षा एक सरस गाण्याची प्रस्तुती केली. अनेक अनुयायांनी अक्षराच्या नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला.
         सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्याने वसंत फुलझेले,धर्मेश पाटील ,शिल्पा नागदेवते यांनी मार्गदर्शन केले.
तर प्रमुख उपस्थितीत रवी नितनवरे,दिलीप फुलझेले,प्रदीप मानवटकर,नागसेन पाटील, योगेश खंडारे , भारती धोटे,शरद चोरपगार,ज्योती पाटील  संदीप तिरपुडे  प्रामुख्याने उपस्थित होते.
        कार्यक्रमात उपस्थितांची संख्या भरगच्च असल्यामुळे अनेकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला,तीन तास चालणाऱ्या कार्यक्रमाचा समारोप कलावंताच्या सत्कार समारंभ  व लगेच बुद्धवंदना घेऊन करण्यात आले. समाज बांधव , उपासक,उपासिका कलावंत  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या