चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती समारोह लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे भिम जयंतीचा कार्यक्रम हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष योगेश मेश्राम, माजी प्राचार्य नरेंद्र गणविर, चेतलाल कटरे, प्रा. विलास नान्हे, नगर परिषद ज्युनिअर कॉलेज पवनी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. यावेळी सामुहिक बौद्ध वंदना घेण्यात आली. उपस्थितांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमातील वक्तृत्व, गीत गायन, चित्रकला, निबंध, संगीत खुर्ची स्पर्धेत माही कोडवते, मनस्वी डोये, ओवी मेश्राम, मंजिरी भोरे, आरूही मडामे, त्रिशा अटारकर, ओजल रामटेके, अंश बोरकर, स्नेहांश कान्हेकर, विनयशील रंगारी, स्वरा भोरे, ओवी मेश्राम, अनवित रामटेके यांनी सहभाग घेऊन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मेडल व शालेय उपयोगी वस्तू बक्षिस देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. विजय गणविर, प्रा. डॉ. महेश भैसारे, नितेश धारगावे, नंदकिशोर भालाधरे, देवेंद्र धारगावे, प्रा. डॉ. राजेंद्रप्रसाद पटले, वर्षा गणविर, मृणाली कान्हेकर, दिपाली भोरे, अस्मिता धारगावे, अश्विनी भैसारे, सुजाता गोस्वामी, स्नेहलता मडामे, प्रभूदास निकोसे, चंदा लांजेवार, मंगला भोयर, अदिती धारगावे, चंदा लांजेवार, कमलेश उके, प्रमोदिनी भालाधरे, योगेश भोंगाडे, रमेश शेंडे, शाम जगनाडे, दुर्गाप्रसाद सुर्यवंशी, राजेश कुकडे, जोगेंद्र मेश्राम, सुभाष सोमनाथे, सुरेश शेंडे, वनिता सार्वे, संतोष तांडेकर, महादेव मून, देविदास माटे, प्रदिप गणविर, सुशिल रामटेके, सुरेश घोनमोडे, प्रा. डाॅ. पुण्यशिल टेंभुर्णे, राजेंद्र तिरपुडे, नागसेन लांजेवार, संतोष तांडेकर, नरेन्द्र नागवंशी, दिपक मेश्राम, कमलेश उके, सुबोध मेश्राम, योगेश भोंगाडे, शिलवंत घोडेस्वार, रत्नघोष भालाधरे, पुण्यशिल गणविर, स्नेहलता मडामे, भारत नंदागवळी, सुभाष गोंडाणे, धनराज सातपैसे, रमेश सार्वे, टेकराम भुते, यशोदा दहिवले, प्रभा चौधरी, तुषार मने, राजेश कुर्वे, विकेश सुखदेवे, प्रा. डाॅ. मुरलीधर नाकाडे, शालिक वनवे, दिलीप रामटेके, चंद्रशेखर निर्वाण, प्रभूदास निकोसे, राजेश डुंभरे, काजल डुंभरे, भास्कर किटे, मंगला किटे, प्रभा चौधरी, नजिर शेख, प्यारेलाल जांभुळकर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश मेश्राम, राहुल रामटेके, अजिंक्य मेश्राम, आदित्य गणवीर, रूपलता गणवीर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. राहुल भोरे व आभार प्रदर्शन राखी रंगारी यांनी केले.


0 टिप्पण्या