Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद शहादेव मोरे यांना,, नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-2026 लातूर येथे सन्मानित.

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर  :  महाराष्ट्र पोलीस सोशल असोशियन महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयो जीत गौरव कर्तव्याचा..! सत्कार समाजसेवकांचा..! मातृभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे! या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दापुरा येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद मोरे यांना''नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-2026 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक मध्यवर्ती बस स्थानकाच्या मागे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रम उद्घाटन सोहळ्या अध्यक्ष सिनेमा अभिनेत्री सुनंदा तू गावकर होत्या, सदर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती समाजसेविका मीनाक्षी पाखरे, युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष पंकज काटे, अभिजीत शिंदे, रामचंद्र तांदळे, अनिस खान पठाण, सिद्धार्थ भैय्या कवठेकर, शितल बलदोटा, साहित्यिक गझलकार मधुबावलकर, मी ज्ञानज्योती सावित्री बोलते गायत्री रामटेके, सुप्रसिद्ध गायक तथा पत्रकार प्रदीप कडबे, सुप्रसिद्ध गायक समाधान लोणकर, डॉक्टर, पत्रकार शाम जाधव, पत्रकारास सुधाकर रणदिवे, सामाजिक कार्यकर्त्या उषा धावरे, सामाजिक कार्यकर्ते बी.आर ढगे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुफी सय्यद संशोधन इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषां च्या प्रतिमेचे पूजन करून व ते दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रबोधनकार भीमशाही तथा पत्रकार सुप्रसिद्ध गायक सदानंद मोरे यांनी आपल्या गायनातून भीम गीत आज सोन्याच्या ताटात जेवतोय बाबासाहेबांची खानदान, आपल्या गायनातून रसिकांची मने मंत्रमुग्ध केले. सामाजिक, पत्रकारितेतील, समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भीमशाहीर सदानंद मोरे यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ शाल मानाचा फेटा देऊन नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 ला प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला साहित्यिक गझलकार मधुबावलकर, भिमशाहीर प्रदीप कडवे रामटेक नागपूर, बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते विभीषण आर, ढगे, सामाजिक कार्यकर्त्या कविता ढगे, मी रमाई बोलते सिफा पवार, सोनाली पाट मासे, भिमशाहिर समाधान लोणकर हिंगोली, उत्कृष्ट कलावंत गायत्री रामटेके, डॉक्टर श्याम जाधव पत्रकार, पत्रकार सुधाकर रणदिवे, मनीष मुथा पत्रकार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक सुफी सय्यद समशुद्दीन यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मांदळे, महादेव गपाट सर यांनी केले, समाजसेवक सुफी सय्यद शमशुद्दीन यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कलावंत, समाजसेवक, उपस्थितीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या