अखेर मायाताई सोनवणे मृत्यूला शरण
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-तालुक्यातील उमरझरी येथील माया रामकृष्ण सोनवाने (वय ५० ) यांना अखेर मृत्यूला शरण जावे लागले. काल ०१ एप्रिलला रात्री १०:४५ वाजता नागपुर येथे रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. शनिवार २८ मार्चला सकाळी ८ वाजता त्या शेतात मिरच्या तोडत असता अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला होता. प्रथम साकोली व नंतर नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सलग तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या मायाबाईंला अखेर मृत्यूला शरण जावे लागले. त्यामुळे साकोली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत सलग तीन घटनांमध्ये केवळ १२ दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. नागझिरा वन्यजीव अभयारण्य परिसराला लागून असलेल्या पिटेझरी वन विभाग अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये गेल्या १०-१२ दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातलेला आहे. दि. १ एप्रिल २०२६ रोजी आमगाव ( बुज. ) या गावातील एक महिला शेतात मोहफुले वेचण्यासाठी आपल्या मुलासह गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना ताजी असतांनाच उमरझरी येथील मायाबाई सोनवणे हिच्यावर वाघाने हल्ला केल्याने नागपूर येथे उपचार दरम्यान काल रात्री मृत्यू झाला. या पूर्वी १९ मार्च २०२७ रोजी बाम्पेवाडा येथील वसंत मेश्राम ( वय ५३ ) हे शेतशिवारात मोहफुल वेचण्यास गेले असता नरभक्षी वाघाने बळी घेतला होता.
___________________________________________
मृत महिलेच्या वारसांना शासनाच्या नियमानुसार मिळणारी सानुग्रह मदत (Compensation) तातडीने मंजूर करण्यात यावी. कागदोपत्री प्रक्रियेत वेळ न घालवता, कुटुंबाचा आधार गेल्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक दिलासा देण्यात यावा.
कुटुंबातील सदस्याला नोकरी (Employment)
घरातील कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबावर ओढवलेली आर्थिक ओढताण पाहता, त्यांच्या मुलाला त्याच्या पात्रतेनुसार वनविभागात किंवा अन्य शासकीय सेवेत प्राधान्याने नोकरी देण्यात यावी. वाघाला जेरबंद करणे (Capturing the Tiger)
संबंधित नरभक्षक किंवा हिंसक वाघाचा शोध घेऊन त्याला तातडीने जेरबंद (Tranquilize & Cage) करावे.
जोपर्यंत वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत त्या भागात वनविभागाचे विशेष पथक तैनात करण्यात यावे..नागरिकांची सुरक्षा (Public Safety) परिसरात रात्रीची गस्त (Patrolling) वाढवण्यात यावी. शेतात किंवा जंगलाशेजारी राहणाऱ्या नागरिकांसाठी सौर दिवे, संरक्षक कुंपण आणि सुरक्षेची साधने उपलब्ध करून द्यावीत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने गावात सतर्कतेचा इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित करावी
माहेश्वरी नेवारे.
माजी जि. प. सदस्य _____________________________________________
मायाताई सोनवणे उमरझरी यांना वाघाने पकडल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आणण्यात आले. जर त्याच वेळेस चांगला उपचार झाला असता तर कदाचित तिला प्राण गमवावे लागले नसते. उपचार बरोबर न झाल्यामुळे आमच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. त्याचा फायदा काल आमगाव ( बु. ) येथील छायाताईला झाला. वाघाने पकडल्यानंतर लगेच योग्य असा उपचार देण्यात आला. उमरझरी गेट जड वाहतुकीसाठी बंद होती ती पूर्ण खुली करण्यात आली. जोपर्यंत मायाताईच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि शासनाच्या नियमानुसार २५ लाखाचा धनादेश देणार नाही तोपर्यंत आमची मागणी कायम राहील.
नेपाल रंगारी.
माजी जिल्हा परिषद सदस्य.
______________________________________________
उमरझरी येथील रहिवासी मायाबाई सोनवणे त्यांचं वाघाच्या हल्ल्यात बरीच दुखापत झाली होती तिला भंडाऱ्यावरून नागपूरला हलवून त्यांच्य इलाज सुरू होता पण त्या अपघातातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही आणि त्यांचा मृत्यू झाला हे दुर्दैव घटना आपल्या परिसरात हे दुसरी घटना घडली
वन विभाग मंत्रालय मार्फत त्यांना जे काय मदत मिळेल ते मिळेलच पण मायाबाई सोनवणे यांच्या परवारातील एक व्यक्तीला वन मंत्रालय विभागामार्फत नोकरी मिळावी याकरिता आमदार नानाभाऊ पडोळे प्रयत्न करतील व तिच्या परिवाराला एक आधार मिळू शकेल सर्वजण प्रयत्न करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
नंदूभाऊ समरीत, पिंडकेपार.
माजी जि.प.सदस्य


0 टिप्पण्या