Ticker

6/recent/ticker-posts

महाज्योतीतील भ्रष्टाचारप्रकरण: प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांना बडतर्फ करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी.... ओबीसी क्रांती मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
​भंडारा : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) येथील प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या व पत्नीच्या नावे खासगी कंपन्या स्थापन केल्या आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप करत, ओबीसी क्रांती मोर्चाने त्यांच्या तात्काळ बडतर्फीची मागणी केली आहे. शिरसाठे यांनी पदावर असताना 'महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन' आणि 'ईझी रूट एक्झिम' सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून शासकीय कंत्राटे लाटून सेवाशर्तींचे उल्लंघन केल्याचे पुरावे सादर करत, या प्रकरणाची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ओबीसी कल्याण विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यामार्फत देण्यात आले. संजय मते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिरसाठे यांची मालमत्ता जप्त करण्याची व महाज्योतीमधील भ्रष्टाचाराचे हे रॅकेट मुळापासून उपटून टाकण्याची आग्रही मागणी केली असून, या निवेदनावर सुरेश खंगार, शोभा बावणकर, एन. के. राजपूत यांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी एकलव्य सेनेचे सुरेश खंगार,रामटेके,मनीषा भांडारकर,एन के राजपूत,पुरुषोत्तम नंदुरकर,पूजा पाटील,अनुष्का पाटील,हर्षिला कराडे कुमुद गजघाटे,कोमल दुबे,यशवंत सूर्यवंशी,अमित मेहर,सुभाष उके, दिगंबर रामटेके,प्रकाश बांते, भाऊ कातोरे,अभिषेक,कोमल,प्रकाश मुटकुरे,युवराज नंदनवार संजय बांते अतुल राघोर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या