चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व सांस्कृति संवर्धन महामंडळ वुमन राईट स असोशीयन ऑफ इंडिया तेलंगणा द्वारा आयोजित, प्रियदर्शी सम्राट अशोक यांची 2023 जयंती, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले द्वि जन्म शताब्दी वर्ष महोत्सव, बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी संयुक्त जयंती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण कृती मूर्ती का भव्य अनावरण समारोह, अशोका,फुले,आंबेडकर फेस्टिवल कार्यक्रम बुधवार दिनांक 29/04/2026 रोजी गोये गाव आसिफाबाद येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक गझलकार कवी मधु बावलकर होते. कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून विधायक को वा लक्ष्मीजी यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ता म्हणून एडवोकेट डॉक्टर सत्यपाल कातकर ( उच्च न्यायालय राजुरा ) प्रमुख अतिथी म्हणून शिवदास महाजन( रिटायडे जज पुणे ) सामाजिक कार्यकर्ते प्रदीप फुलझे ले कामठी, सत्यशोधक रघुनाथ ढोक, सत्यशोधक मेजर चंद्रकांत उजगरे, प्राध्यापक डॉक्टर सुनील व्यवहारे, सत्यशोधक दिलीप नेवसे पाटील, कवी साहित्यिक नागनाथ डोलारे पनवेल, गणेश मेकाने, अशोक माहोलकर वाकडी, प्रभाकर ग ड पाय ले, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी कमलेश पाटील वर्धा, समाजसेविका गायिका अल्का लाडे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे रामटेक, उत्कृष्ट कलावंत गायत्री रामटेके, समाजसेविका गायिका नीलकमल गोंडाने, भीम शाहीर आनंद भगत भद्रावती, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा हस्ते महापुरुषांचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा सक्रिय कार्यकर्त्या तथा गायिका नीलकमल दिलीप कुमार गोंडाणे आंधळगाव तालुका.मोहाडी जिल्हा भंडारा. अबोध भजन मंडळा मार्फत समाज प्रबोधनाच भीम गीत गायनाचे कार्यक्रम सुरू आहे. सामाजिक कार्य, कला क्षेत्रामध्ये, समाज प्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन ' महाकवी वामनदादा कर्डक राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला गायिका योजना कुक्कड कर गडचिरोली, गायिका संगीता हस्ते, अबोध भजन मंडळाचा गायिका नीलकमल गोंडाने, बालकलाकार शिपा पवार भद्रावती, पंचशीला बेले, गायिका मंगला कांबळे, तुकाराम जाधव, अनिल कुक्कडकर, इत्यादी संयोजक समिती अध्यक्ष तारू नगरा रे, दत्तू ताकसांडे, एम शंकर, टी आनंदराव, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कवी साहित्यिक गझलकार मधुबावलकर यांनी उपस्थित पाहण्याचे आभार मानून सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने समाज बांधव महाराष्ट्रातील कलावंत समाजसेवक उपस्थित होते.


0 टिप्पण्या