Ticker

6/recent/ticker-posts

अंजनीपुत्र नामाने भक्तिमय झाले वडद फाटा मंदिर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त सावरबंध येथील श्री हनुमान मंदिर वडद फाटा येथे ( गुरूवार ०२ एप्रिल ) ला मोठ्या भक्तिभावाने जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. येथे संगीतमय भजनात गोपालकाला, महा आरती व महाप्रसाद वितरण करण्यात आले. सर्व आयोजन हे श्री हनुमान मंदिर वडद फाटा मित्र मंडळ वतीने करण्यात आले होते. वडद फाटा येथे श्री हनुमान मंदिरात सन २००७ ला तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब देवलकर यांनी हा पुढाकार घेऊन महाप्रसादाचे आयोजन सुरू केले होते. तेव्हापासून दरवर्षी सातत्याने येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. गुरुवारी ता. ०२ ला येथे सकाळी विधीवत पूजा अर्चना करण्यात आली. श्री शारदा माता भजनी मंडळ वडद येथील ह. भ. प. श्री. विठ्ठल महाराज मेंढे सावरबंध, धनराज दोनोडे भजन मंडळाने संगीतमय भजनात गोपालकाला संपन्न करीत महा आरतीने समापन करण्यात आले. प्रसंगी येथे साकोली - चंद्रपूर राज्यमार्गावर शेकडोंच्या संख्येने भक्तभाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या जन्मोत्सवात साकोली येथील छत्रपती ग्रुपचे मुस्लिम बांधवांनी सुद्धा सम्मिलीत होऊन सर्वधर्म समभावाचा परीचय दिला ही गौरवास्पद बाब. या आयोजनात सरपंच माधवी बडवाईक, कैलास गोडशेलवार, डॉ. अनिल शेंडे, विनायक देशमुख, ओम गायकवाड, राकेश गोडशेलवार, उमेश भुरे, नगरसेवक नयन पटेल, प्रमोद गजभिये, सुरेश बघेल, विजय दूबे, रवि परशुरामकर, भोजराम बडवाईक, नंदू गेडाम, मोहनिश खान, जावेद शेख, आशिष मारवाडे, हेमंत भारद्वाज, केदार राऊत, सोनू थानथराटे, दिपक हिवरे, पिंटू परशुरामकर, आशिष चेडगे, अनिल जगिया, जयकृष्ण डुंभरे, शेखर रामटेके, महाप्रसाद वितरक संदीप कोल्हे, राकेश बडवाईक यांसह वडद, साकोली आणि सावरबंधचे श्री हनुमान मंदिर समितीचे सदस्यांनी हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या