Ticker

6/recent/ticker-posts

माननीय प्रफुल भाई पटेल यांच्या पुढाकाराने भंडारा नॅशनल हायवे चौपदरीकरण सर्विस रोडच्या प्रश्न लागणार मार्गी.

जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांचा माननीय प्रफुलभाई पटेल यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-   मा. प्रफुलभाई पटेल जिल्ह्याच्या दौऱ्यावर विश्रामगृह भंडारा येथे पदाधिकारी व कार्यकर्ता भेट घेत सर्वांची समस्या ऐकून घेतली. या भेटीदरम्यान आमच्या वतीने( यशवंत सोनकुसरे जिल्हा परिषद सदस्य गणेशपुर) मुजबी ते कारधा प्रगतीपथावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची समस्या पुनश्च प्रफुलभाई यांना आठवण करून देण्यात आले. 
या अगोदर च्या19/02/2026 दौऱ्यात सुद्धा रीतसर प्रफुल भाईंना प्रगतीपदरावर असलेल्या चौपदरीकरणाच्या सर्विस रोड समस्या बद्दल अवगत केला होता. 
मा. प्रफुलभाई यांनी लगेच त्यावेळी  नितीनजी गडकरी यांच्या कार्यालया ला फोन लावून तिथल्या अधिकाऱ्यांना हायवेच्या समस्या बद्दल सांगत समस्या लवकरात लवकर सोडवावे अशी सूचना केली होती.

08/04/2026 ला विश्रामगृह भंडारा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषद मध्ये काही पत्रकार महोदय यांनी प्रगती प्रथावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात व सर्विस रोड संदर्भात पुन्हा प्रश्न विचारात ही समस्या मार्गी लावल्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. 
त्यावेळी सन्माननीय प्रफुल भाई पटेल यांनी पत्रकारांना माहिती देत सांगितलं की आमचे जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या माध्यमातून हा प्रश्न माझ्याकडे आला आणि मी लगेच नितीनजी गडकरी यांच्या कार्यालयाला संपर्क साधला व संबंधित अधिकाऱ्यांना सर्विस रोड व प्रगतीपथावर असलेल्या हायवेच्या समस्या सोडवण्यासंदर्भात सांगितलेला आहे.   
या दौऱ्यात सुद्धा पुन्हा मा.नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्या बाबत सांगितले.
सर्व पत्रकार बंधून यांना प्रफुल भाई यांनी सांगितले  की प्रगतीपथावर असलेल्या नॅशनल हायवे ची समस्या निश्चितच सुटेल सर्विस रोडची लोकांची रास्त मागणी चा प्रश्न मार्गी लागेल. त
यासाठी आम्ही प्रयासित आहोत अशी ग्वाही प्रफुल भाई यांनी या पत्रकार परिषद दरम्यान दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या