Ticker

6/recent/ticker-posts

रेती तस्करी करणारा १ टिप्पर पकडला


उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय साकोली पथक व लाखनी पोलिसांची आलेसुर येथे संयुक्त कारवाई

२० लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

टिप्पर चालक,क्लिनर व मालकावर गुन्हा दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकीवर कारवाई करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय साकोली पथक व लाखनी येथील पोलीस संयुक्त पट्रोलिंग करीत असताना एक पांढरा  रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.३६ ए.ए.४७८६ने चुलबंद नदीच्या पळसगाव पात्रातून विना परवाना विना पास रेतीची अवैद्य वाहतूक करतांना मंगळवारी(ता.७एप्रिल) रोजी रात्री ०९.१५ वाजता दरम्यान मिळून आल्याने टिप्पर चालक,क्लिनर व मालक यांच्यावर लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत
२० लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी चालकाचे नाव  आकाश भैय्या मिरासे(२४वर्ष) रा.डव्वा ता.जि.भंडारा,
क्लिनर कुणाल देवचंद निंबार्ते(वय २७वर्ष)
 रा.डव्वा ता.जि.भंडारा यांचेसह टिप्पर मालक परवेज आकबानी
(वय४०वर्ष) रा.ता.लाखनी असे आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता पोलिस विभागाला आदेश निर्गमित केले आहेत.त्यानुसार जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांची पेट्रोलिंग अहोरात्र सुरू आहे.मंगळवारी रात्रीच्या सुमारास लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आलेसूर गावाजवळील पटाच्या दाणीजवळ याच संयुक्त पथकातील पोलीस कर्मचारींनी पेट्रोलिंग दरम्यान मंगळवारी ७ एप्रिल रोजी रात्री ०९.१५ वाजता दरम्यान टिप्पर चालकास २० लाख रुपये किंमतीच्या टिप्परसह ३० हजार रुपये किंमतीची ६ ब्रास रेती असा एकूण २० लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष  घटनास्थळावरून जप्त करून अवैध व विना परवाना विना पास रेती वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवितांना मिळून आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पथकातील पो.शि.लोकेश पांडुरंग कोटवार यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी टिप्पर चालक, मालक व क्लिनर या तिघांविरुद्ध अपराध क्रमांक१७६/२०२६ कलम ३०५(ई),३(५)४९भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाखनी पोलीसांकडून केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या