चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-जनजागर कला साहित्य बहुउद्देशिय संस्था साकोलीच्या वतीने संगणक वर्ग करण्यासाठी बाहेरगावून येणार्या विद्यार्थ्यांना बस पासेसची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी आगार व्यवस्थापक साकोली यांचे मार्फत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राज्य परिवहन महामंडळ मुंबई तसेच आमदार नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. आजच्या विज्ञान युगात संगणकाचे ज्ञान खूप महत्वाचे आहे प्रत्येक विभागीय कार्यालयात व विविध क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक, व्यवसायिक व विविध क्षेत्रात संगणकाच्या साहाय्याने सर्व कामे केली जातात.त्या आधारावर सर्व विद्यार्थी साकोळी येथे संगणकाचे वर्ग लावतात. परंतु त्यांना येण्याजाण्यासाठी बस प्रवास सवलत मिळत नाही. मात्र ती सवलत टायपिंग क्लासेस साठी आहे. ज्या पद्धतीने टायपिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी बस पास सवलत आहे. तसेच संगणक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा येण्याजाण्यासाठी बसमध्ये पासेसची सवलत देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना जनजागर संघटनेचे अध्यक्ष प्रबोधनकार भावेश कोटांगले, उपाध्यक्ष उमेश भोयर, संचालक इंद्रजीत लांजेवार, दिपक मेश्राम, नितीन रामटेके, कार्तिक मेश्राम, नरेश राऊत सरपंच तुडमापुरी, रोशन भोवते उपस्थित होते.


0 टिप्पण्या