चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-डॉक्टर मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या अध्यक्षतेखाली श्री नरसिंग जाधव तहसीलदार चाकूर श्री संतोष वंगवाडे गटविकास अधिकारी चाकूर श्री शिवानंद ऐबतपुरे भाजप वक्ते श्री सज्जनकुमार लोणाळे माजी उपसभापती पंचायत समिती चाकूर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
चाकूर तालुक्यातील शेळगाव महसूल मंडळ विभागामध्ये आज दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा लोकाभिमुख उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हा जनतेच्या विविध विभागाशी संबंधित असलेल्या अडचणीची सोडवणूक तसेच त्याच मंडळामध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून जनतेच्या समस्या जागेवरच सोडवण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे म्हणून जनतेने आपल्या समस्या तालुक्यापर्यंत किंवा जिल्हापर्यंत न जाता आज रोजी आपल्या समस्या आपल्याच गावांमध्ये सोडवुन करून आपली काम तत्पर करून घ्यावीत असे आवाहन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना डॉक्टर मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांनी केले. या अभियानामध्ये 15 पेक्षा जास्त बाबी वरती आपण काम करीत आहोत जसे की, डिजिटल सातबारा वितरण, शैक्षणिक प्रमाणपत्र वाटप, विविध योजनांचे मंजुरी पत्र तसेच प्रमाणपत्र वाटप, ई मोजणी , कमी जास्त पत्रक, प्रलंबित फेरफार अकृषिक एन ए परवानगी, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत प्रकरणाचा निपटारा, सातबारा मधील चुकांची दुरुस्ती, घरांसाठी पट्टेवाटप इ मोजणी अर्ज, ॲग्री स्टॅग आणि पीएम किसान नोंदणी, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसाह्य योजनांचे लाभ मंजूर करणे, प्रमाणपत्र भूसंपादन व अकर्षित परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करणे. या आणि यासारखे असंख्य काम आपल्याला या अभियानाच्या माध्यमातून करावयाचे आहेत. तसेच 2002 च्या मतदार यादी सोबत बि एल ओ च्या माध्यमातून गावागावांमध्ये मतदाराची मॅपिंग करण्याचं काम चालू आहे आपल्या बि ल ओ ला सर्व माहिती देऊन आपली मतदार यादी मधली नावे कायम करून घ्यावीत अन्यथा मतदार यादी मधले नाव कमी होऊ शकते, तसेच मतदार यादीतील नाव कमी झाल्यास आपणास तालुका तहसील कार्यालयामध्ये विविध पुरावे देऊन सुनावणीच्या माध्यमातून नाव घेण्यात येतील, यामध्ये आपलाही वेळ जाईल तसेच योग्य पुरावे नसतील तर मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी समस्या निर्माण होईल. याकरिता बीएलओला सहकार्य करून आपली मतदार यादीतील नाव मॅपिंग करून कायम करून घ्या. असे प्रतिपादन यावेळी केले.
यावेळी प्रास्ताविक भाषण करताना श्री.नरसिंग जाधव तहसीलदार चाकुर यांनी महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या शासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारची आडूनुक होऊ नये याकरिता त्या त्या गावांमध्ये हा उपक्रम राबवून त्या त्या गावातील जनतेच्या समस्या दूर करण्याचे काम याद्वारे होत आहे कोणतेही काम जनतेने सहकार्य केल्याशिवाय तसेच जनतेच्या सहभागाशिवाय पूर्ण होत नाही यासाठी आपण आपली काम या योजनेचा परिपूर्ण लाभ घेऊन करून घ्यावीत.
परवाच महाराष्ट्र शासनाने शेतीशी संबंधित असलेले पानंद रस्ते नकाशावरील रस्ते या रस्त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की कोणत्याही शेतकऱ्याने रस्त्यावर अतिक्रमण किंवा रस्त्या अतिक्रमणमुक्त करताना अडवणूक केल्यास त्याचे ॲग्री स्टॅग चे कार्ड तसेच आधार कार्ड पाच वर्षासाठी रद्द करण्यात येईल असा कठोर परंतु शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे तरी कार्यवाहीस पात्र न होता आपल्या गावातील रस्ते मजबूत व पक्के करून घेऊन शेतकऱ्यानी आपल्या शेतीच्या रस्त्याचे मजबुतीकरण करून घ्यावे. प्रगती करण्यासाठी सहकार्य करावे.
तहसील कार्यालया अंतर्गत असलेली जनतेची कोणतीही काम योग्य व कायदेशीर कागदपत्र दाखल केल्यास विना विलंब तात्काळ सेवेच्या माध्यमातून दिली जातील.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शैक्षणिक प्रमाणपत्र, लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, महिला व बालकल्याण विभागाकडून बेबी किटचे वाटप, कृषी विभागाकडून कांदा चाळ पूर्वतयारी मंजूर पत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वडगाव एकी उपसरपंच राजकुमार लोणारे ग्रामपंचायत कर्मचारी संगमेश्वर बिरादार विशाल केंद्रे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी शेळगाव मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी श्री निळकंठ केंद्रे, ग्राम महसूल अधिकारी अंकुश वडगावे, दत्तात्रय मोरे, प्रशांत नादरगे,मुक्ता भुरकापल्ले, मीरा सूर्यवंशी, मेघश्याम होळंबे, यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार दिगंबर स्वामी शैलेश निकम संतोष धाराशिवकर सहाय्यक महसूल अधिकारी अनिल कचरे, महसूल सहायक संजय कासराळीकर, रामदास माने,जिल्हा परिषद शाळा वडगाव चे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
या समाधान शिबिर अभियानामध्ये सहभागी महसूल विभागाचा निवडणूक विभाग संगायो इंगायो विभाग,सांगायचो इंगायो विभाग पुरवठा विभागाचे कक्ष, आरोग्य तपासणी आभा कार्ड, वय वंदना कार्ड काढणे,याचा कक्ष,कृषी विभागाचा कक्ष,आधार प्रमाणीकरण केंद्र,पंचायत समिती कक्ष, भूमी अभिलेख कक्ष, पशुसंवर्धन विभाग कक्ष, शिक्षण विभाग,बचत गटाचा कक्ष, भारतीय स्टेट बँक कक्ष,उमेद कक्षाच्य माध्यमातून सेवा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्र संचलन उपसरपंच श्री राजकुमार लोणाळे व ग्राम महसूल अधिकारी श्री दत्ता मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजकुमार लोणाले यांनी केले


0 टिप्पण्या