Ticker

6/recent/ticker-posts

रेती तस्करी करणारा ७ लाखांचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त

स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलिसांची कारवाई


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:भंडारा जिल्हा पोलीस
अधीक्षक नुरूल हसन यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेअंतर्गत भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी खूनारी येथे कारवाई केली.

चुलबंद नदीपात्रातून विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा आयशर ३८० कंपनीचा ट्रॅक्टर पकडून एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.१८ एप्रिलला दुपारी १.३०वाजता दरम्यान पालांदूर पोलीस
ठाण्याच्या हद्दीतील खुनारी गावाजवळ हे पथक गस्त घालत होते.यावेळी चुलबंद नदीच्या पात्रातून अवैध्य रेती उपसा करून जाणारा सिल्व्हर रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच २९/ एके ३०२१) व लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह पोलिसांना संशयास्पदरीत्या आढळला. तपासणी केली असता ट्रॅक्टर चालक/मालक आकाश तानाजी कठाने(वय २५वर्ष)
रा.ढिवरखेडा ता.लाखनी हा रेती वाहतुकीची रॉयल्टी किंवा पास सादर करू शकला नाही.याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक/मालक याच्यावर गुन्हा दाखल केला.
 पोलिसांनी ७ लाख ५०हजार रुपये किमतीचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर आणि ६ हजार रुपयांची १ब्रास रेती असा एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.पोलीस हवालदार विजय विठ्ठलराव राऊत यांच्या तक्रारीवरून पालांदूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई),अन्वये गुन्हा नोंदविला.पुढील तपास पालांदूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार देवेंद्र मासुरकर करत आहेत.अशा या दररोज रेती तस्करी करणाऱ्या वाहनांवर होणाऱ्या कारवायांमुळे परिसरातील रेतीमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या