चित्रा न्युज प्रतिनिधी
रामटेक : दिनांक - 3 एप्रिल 2026 रोजी शुक्रवारला मा. अर्थ व नियोजन राज्यमंत्री नामदार,एडव्होकेट श्री आशिष जयस्वाल,यांना रामटेक तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष - दिपक मोहोड यांचे नेतृत्वात जागेश्वर गजभिये, सागर लोंढे, भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे,पंढरी कडू, कैलास समरीत, दुर्गाताई लोंढे, सुरेखाताई बोरकर,गजभिये ताई इत्यादीचे कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ भेटून महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ, नागपूर विभाग ग्रंथालय संघ, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ, तसेच रामटेक तालुका ग्रंथालय संघाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांना वाढदिवसाच्या हार्दिक खुप खुप शुभेच्छा दिल्यात.तसेच त्यांना ग्रंथालय प्रश्नासंदर्भात व ग्रंथालयाचे मागण्या संदर्भात चर्चा केली.या चर्चे दरम्यान त्यांनी गंभीर्यापूर्वक प्रश्न समजावून घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. मोठ्या संख्येने रामटेक तालुका ग्रंथालय संघाचे कार्यकर्ते व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या