Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर मनपा आयुक्तांना बसपाचे निवेदन

मनपात स्वतंत्र कक्ष उभारावा!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : महानगरपालिकेत बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) वतीने निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका  सोनिया प्रशांत उंदीरवाडे यांना पक्षनेत्या म्हणून मान्यता देऊन महापालिकेत स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसंदर्भात काल चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले.
बसपाच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात, महापालिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व प्रभावीपणे करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने मांडण्यासाठी पक्षनेत्यांना स्वतंत्र कक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 निवेदन देताना प्रदेश सचिव तथा जिल्हा इन्चार्ज मकेश्वर , जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, जिल्हा प्रभारी धर्मेश निकोसे, जिल्हा सचिव संजय मेश्राम, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष किशन केसकर, शहर अध्यक्ष सोनू रायपुरे, नगरसेविका सोनिया प्रशांत उंदीरवाडे, प्रशांत उंदीरवाडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बसपा पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या