स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांची कारवाई...
मुरमाडी तुप येथिल प्रकार...
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा: लाखणी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 7 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप.क्र. 90/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 305 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पो.हवा. संजय तेजराम दोनोडे स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास मुरमाडी (तुप.) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था परिसरात ही घटना घडली. यावेळी आयुष मनोज चारमोडे (वय 17 वर्ष 5 महिने, रा. मेंढा (पोहरा), ता. लाखनी, जि. भंडारा) हा विधीसंघर्षग्रस्त बालक त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरद्वारे शासनाची रेती विनापरवाना चोरट्या पद्धतीने वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी कारवाई करताना महिंद्रा 475 DI SP PLUS कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 36 AL 3088) व त्यास जोडलेली ट्रॉली तसेच अंदाजे 1 ब्रास रेती असा एकूण 7,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास पो.हवा.धनराज भालेराव करीत आहेत. तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकास ताबा पावतीवर रेखा योगराज कमाने (रा. पिंपळगाव) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीचा पूर्वइतिहास नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


0 टिप्पण्या