चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील महसूल मंडळ " पिंपळगाव/ सडक आणि साकोली तालुक्यातील महसूल मंडळ एकोडी/किन्ही अंतर्गत येत असलेल्या स्मार्ट ग्राम खैरी/ वलमाझरी " येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा - 1 शिबिराचे आयोजन 10 एप्रिल 2026 रोज शुक्रवारला करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ महसूल मंडळ गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेण्याचे आवाहन तहसीलदार लाखनी व साकोली यांनी केले आहे.
या शिबिरात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, विद्युत वितरण विभाग, वन विभाग, पंचायत समिती, आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून सेवा देणार असून समस्यांचे निराकरण करून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, आधार अपडेट, ई - केवायसी, आधार सीडींग, 7/12 उतारा, गाव नमुना - 8, कौटुंबिक शिधापत्रिकांचे वाटप, फेरफार अर्ज, मोजणी संबंधी अर्ज, फार्मर आयडी आणि इतर सेवा व योजनांचा लाभ या शिबिरात घेता येणार आहे.
करिता या शिबिरामध्ये मंडळातील येणाऱ्या सर्व गावातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार शितल घावटे, लाखनी व निलेश कदम, साकोली यांनी केले आहे.


0 टिप्पण्या