Ticker

6/recent/ticker-posts

योगासनां द्वारे रोगोपचार आरोग्यासाठी चांगले उपाय:डॉ.विशाखा जीभकाटे

(योगभारती बहु.संस्था  तर्फे योग साधकांकरिता शिवार्पण टॉवर येथे आरोग्य शिबीर संपन्न)

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-1 एप्रिल रोजी शिवार्पण टॉवर राजीव गांधी चौक भंडारा येथे योग साधिका सौ.वनिता देशमुख यांचे जन्म दिनाचे औचित्य साधून  योगभारती च्या सौजन्याने  तज्ञ डॉक्टरांचे स्वास्थ्य शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ठिकाणी श्रीमती रेखा वासनिक होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणुन सौ. वनिता देशमुख, इंद्राक्षी आय केयर च्या डॉ. सौ. विशाखा जीभकाटे,स्त्री रोगतज्ज्ञ व होमिओपॅथी कन्सल्टंट अध्यक्षा सौ. माधुरी बोधनकर, सौ. चित्रा मोहतुरे ,सौ.हिरा रेवतकर, सौ.गीता बांते , सौ. हुमंता हातझाडे , सौ. बेलू पशिने, सौ. सपना तिबुडे,प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे ,योग शिक्षक चिंधुजी बुधे,प्रा.गुरुप्रसाद पाखमोडे,एस.डी.शेख, अतुल वर्मा, प्रभुदास पराते,हरिभाऊ थोटे, ललित बिसेन इत्यादी उपस्थित होते. अध्यक्षा रेखा वासनिक यानी महिलांना खूप कामे करावे लागते आणि तरीपण वेळ काढून त्या योगा शी जुळल्या आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन  केले."योगासनां द्वारे रोगोपचार हे शारीरिक रोगांवर एक चांगले उपाय असून शरीर,मन व श्वास संतुलना च्या माध्यमातून केले जाते. तान,तणाव कमी करून रक्त संचार सुधारते "असे डॉ.सौ. विशाखा जीभकाटे यांनी आपले मत  व्यक्त केले. प्रमुख अतिथी डॉ. सौ.माधुरी बोधनकर यांनी योग व व्यायाम ने शरीर सुदृढ़ होते असे सांगून 6 ते 26 एप्रिल पर्यंत नि:शुल्क शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली .शामकुकडे, प्रा.गुरुप्रसाद पाखमोडे, चिंधुजी बुधे 
 सईद शेख, इंद्रजित येळणे,सौ. हुमंता हातझाड़े,बेलू  पशीने ,इत्यादीनी ही मार्गदर्शन केले.सौ. वनिता देशमुख यांचे ही या दिवशी जन्मदिवस असल्याने प्रमुख पाहुणे व  सर्व योगसाधकांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून हार्दिक शुभेच्छा दिल्यात. शामकुकडे यांनी सूत्र संचालन केले तर आभार अतुल वर्मा यांनी मानले. आत्माराम बेदरकर ,पुरुषोत्तम  साकुरे ,संजय मोहतुरे  इत्यादींनीं या  करिता सहकार्य केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या