Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखा भंडारा उपविभाग साकोली पथकातील पोलिसांची मुरमाडी(तूप.)येथे कारवाई


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:- लाखनी तालुक्यातील चुलबंद नदी मिरेगाव, सोनमाळा, डोंगरगाव, भुगांव, पळसगाव, वाकल, नर्व्ह ,पात्र, मऱ्हेगाव इत्यादी गावा शेजारून वाहत असून महसूल विभागाकडून सदर रेती घाटाचे लिलाव न झाल्यामुळे करोडो रुपयांची पांढरी शुभ्र रेती  तस्कराच्या स्वाधीन करण्यात आली आहे. चुलबंद नदीतील  पांढऱ्या शुभ्र रेतीला तालुक्यात  मोठ्या प्रमाणात  मागणी आहे. त्यामुळे दिवस रात्र मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे.

पिंपळगाव खराशी रोड वर दि. 02/04/2026 रोजी स्था.गु. शा.भंडारा येथील  उपविभाग साकोली पथकाने पो. स्टे. पालांदूर हद्दीतील मौजा मुरमाडी (तुप.) शिवारात अवैध रेती वाहतूक बाबत रेड केली असता आरोपी टिप्पर चालक  नामे हरिचंद्र रामकृष्ण बागडे वय 32 वर्ष रा. दैतमांगली ता. लाखनी, जि. भंडारा हा त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या ASHOK LEYLAND कंपनीच्या टिप्पर क्र MH 36 AA 2399 मध्ये 05 ब्रास रेतीची विना परवाना वाहतूक करताना मिळून आला .

फिर्यादी. पो.हवा संदीप भानारकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ,आरोपीविरुद्ध टिप्पर चालक  नामे हरिचंद्र रामकृष्ण बागडे वय 32 वर्ष रा. दैतमांगली ता. लाखनी, जि. भंडारा हा त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या ASHOK LEYLAND कंपनीच्या टिप्पर क्र MH 36 AA 2399 यांच्या वर पोलिस स्टेशन पालांदूर येथे अप क्र.  86/2026 कलम 305(ई) भा.न्या.सं.  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
 
1) 05 ब्रास रेती किंमत 30,000/ रू
2) 01 ASHOK LEYLAND कंपनीचा टिप्पर क्र MH 36 AA 2399 किंमत 30,00,000/- असा एकूण किंमत 30,30,000/- रु चा मुद्देमाल पोलिस स्टेशन पालांदूर येथे जप्त करण्यात आला.असून पुढील तपास ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक सतिश बन्सोड यांच्या मार्गदर्शनात सूरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या