Ticker

6/recent/ticker-posts

हुतात्मा स्मारक येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र साप्ताहिक बैठक पार पडली.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : दि.१६/०४/२०२६ राज गुरूवारला साप्ताहिक बैठक हुतात्मा स्मारक, भद्रावती येथे पार पडली. बैठकीला प्रवीण चिमुरकर, डॉ. ज्ञानेश हटवार, भारत खोब्रागडे, सौ. करुणा मोघे, सोनल वावरे, गुरुदेव बावणे, विनोद ठमके आणि नामदेव रामटेके उपस्थित होते.
मागील आठवड्यात आलेल्या तक्रारीवर या प्रमाणे  कारवाई करण्यात आली. 
 चंद्रपूर येथील प्रशिद्ध अकॅडमी मध्ये JEE साठी सोमेश्वर उपरे यांनी आपल्या मुलाचा प्रवेश १०,०००/- देऊन घेतला. परंतु नंतर मुलाला अकॅडमी मध्ये शिक्षण घ्यायचे नसल्याने सोमेश्वर उपरे यांनी संचालकाला प्रवेश रद्द करून पैसे परत करण्यास विनंती केली. मात्र संचालकाने उपरे यांना पैसे परत करण्यास साफ नकार दिला. डिसेंबर २०२५ पासून  उपरे यांनी सतत प्रयत्न केले. मात्र त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे उपरे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रकडे धाव घेतली आणि दिनाक ०९/०४/२०२६ ला लिखित स्वरूपात तक्रार दिली.
     प्राप्त तक्रारीवर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीचे अध्यक्ष, प्रवीण चिमुरकर यांनी दि.१०/०४/२०२६ रोज शुक्रवारला संस्थाचालकाला फोन करून ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बद्दल माहिती देत काय कारवाई होऊ शकते याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यावर लगेच संचालकांने ग्राहकाचे पैसे परत करण्यास होकार दर्शवला आणि दि.१३/०४/२०२६ रोज सोमवारला ग्राहकाचे पैसे थेट ग्राहक खात्यावर जमा केले.
     मागील ५ महिन्यांपासून त्रासलेल्या ग्राहकाला न्याय मिळाल्याने सोमेश्वर उपरे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे मनापासून आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या