चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी : व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक लाखनी येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या, सुविधा आणि हक्कांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीत व्हॉइस ऑफ मीडिया भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांवर ठोस भूमिका मांडण्यात आली. यामध्ये पत्रकारांना बसपास सुविधा मिळावी, पात्र व योग्य व्यक्तींना पत्रकारितेत संधी मिळावी, अपघातग्रस्त पत्रकारांना तातडीने ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी, पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या पाल्यांना महाराष्ट्र राज्य सेवा आयोग परीक्षेचे मोफत ऑनलाईन व ऑफ लाईन वर्ग उपलब्ध करणे तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि अत्याधुनिक पत्रकार भवन उभारण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
याशिवाय, पत्रकारांना त्यांच्या कार्यादरम्यान येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणे अत्यावश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीस व्हॉइस ऑफ मीडियाचे लाखनी तालुकाध्यक्ष कल्याण राऊत, जेष्ठ पत्रकार कालिदास खोब्रागडे, देवराम फटे, उमेश सिंगनजुडे, मिथिलेश गिरेपुंजे, मुकेश मेश्राम, नरेंद्र मेश्राम, रोशन खोब्रागडे, अतुल नागदेवे, खुशाल भुरे, मदन कमाने, रवी धोत्रे, राजू खान, तुषित गजभिये, चंदन मोटघरे, शमीम ए. कबानी, भावेश धंधुकीया, अनिल शेंडे, श्यामसुंदर उके, प्रणय सहदेवकर आदींची उपस्थिती होती.
बैठकीत पत्रकार संघटनेची एकजूट मजबूत करण्यावर आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


0 टिप्पण्या