चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी व जनावरे व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी अकलूज येथे दर सोमवारी गुरांचा बाजार भरत होता. मात्र वाढत्या मागणीचा विचार करून आता दर सोमवारी व शुक्रवारी जनावरांचा आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला,या निर्णयामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून व्यवहार अधिक सुलभ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.


0 टिप्पण्या