चित्रा न्युज ब्युरो
जपान : जपानमध्ये सोमवारी जोरदार भूकंपाने उत्तर भाग हादरला असून, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर जपानच्या हवामान विभागाने तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला असून, सुमारे ३ मीटर (१० फूट) उंच लाटांचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
या भूकंपाचे धक्के राजधानी टोकियोसह अनेक शहरांमध्ये जाणवले. अनेक इमारती हलल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. भूकंपानंतर सुमारे ४० मिनिटांनी इवाटे प्रांतातील कुजी बंदरावर सुमारे ८० सेंटीमीटर (३१ इंच) उंच लाटा आदळल्याची माहिती समोर आली आहे.
परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने किनारी तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलण्याचे आवाहन केले आहे. उंच भागात किंवा सुरक्षित आश्रयस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढील आदेश मिळेपर्यंत तेथेच थांबण्याचे सांगण्यात आले आहे. त्सुनामीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या