Ticker

6/recent/ticker-posts

तथागत विद्यालय केसलवाडा येथील विद्यार्थिनीचा NMMS परीक्षेत झळकदार कामगिरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा : 2025 या वर्षातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या (NMMS) परीक्षेत तथागत विद्यालय, केसलवाडा ता.पवणी जि.भंडारा येथील कु. माधवी राजू चौधरी (रा. पिलांद्री) हिने अनुसूचित जनजाती (ST) प्रवर्गातून जिल्ह्यात 5 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत असताना माधवीने हे यश मिळवले असून तिच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. या यशामुळे तिला पुढील 5 वर्षांसाठी दरवर्षी ₹12,000 शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे तिच्या पुढील शिक्षणाला मोठी आर्थिक मदत होणार आहे.
या यशाचे श्रेय माधवीने आपल्या आई-वडिलांसह शाळेतील मार्गदर्शक शिक्षक श्री. रोहित फेंडर सर, महिमा विनकणे मॅडम, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांना दिले आहे.
माधवीच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून तिचे कौतुक होत असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या