सुरजागडची खाण करणार मुलचा विनाश - नगराध्यक्ष एकता समर्थ
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल शहर हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून एक शांत व सुंदर शहर आहे. या शहराच्या अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केळझर या गावात पूर्वीपासूनच माल धक्का आहे. त्यामुळे पुन्हा मुल या शहरांमध्ये नव्याने माल धक्का सुरू केल्यास येथे प्रदूषणात वाढ आणि अपघाताच्या संख्येत वाढ होईल. म्हणून मूल वासियांचा या माल धक्क्यास तीव्र विरोध आहे.अशी माहिती माल धक्का हटाव संघर्ष समिती द्वारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
स्थानिक एन.डी. हॉटेल येथे आयोजित या पत्रकार परिषदेला मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकता समर्थ सभापती प्रशांत समर्थ आणि मूल शहरातील उद्योग, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सन 2023 मध्ये सुरजागड येथील लोह खनिजाची वाहतूक चांदा फोर्ट गोंदिया रेल्वे मार्गावरून करण्यासाठी मूल शहरात माल धक्का प्रस्तावित करण्यात आला होता.
मात्र त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध करून या माल धक्क्याला केळझर येथे स्थानातील केले.
यासाठी रेल्वे विभागाने कामही सुरू केले होते. परंतु या प्रकल्पामुळे शहराच्या मध्यातून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रक वाहतूक होणार असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका व प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. तसेच शहरातील एकमेव कर्मवीर महाविद्यालयाचे मोठे मैदान नष्ट होण्याची शक्यता होती. या विरोधात मूलमध्ये 5000 हून अधिक विद्यार्थी, व्यापारी, नागरिकांनी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत मोर्चा काढून या प्रस्तावित मालधक्क्याला विरोध केला होता. त्यावेळी रेल्वे विभागाने मूल शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असल्यास केळझर येथे याच रेल्वे मार्गावर नवा माल धक्का सुरू केला. सध्या याच मार्गाने या लोह खनिजाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मूल शहरात नव्याने वेगळ्या माल धक्काची कोणतीही आवश्यकता नाही. अशी ठाम भूमिका मूलवासीयांनी घेतली आहे. या संदर्भात मूल नगर परिषदेने विशेष सभेचे आयोजन करून सर्वानुमते एक ठराव घेऊन मुल शहरात प्रदूषणाची वाढ होऊ नये, अपघातांची वाढ होऊ नये व शहराचे सौंदर्य अबाधित राहावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
याठिकाणी माल धक्का व्हावा अशी या शहरातील काही राजकीय लोकांची इच्छा आहे. ते मूल वासीयांचा जीव धोक्यात टाकू पाहत आहेत.
त्यात त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का? याची आम्हाला जाणीव नाही. परंतु शहरातील या राजकीय लोकांचे हितसंबंध पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी आखलेला हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशी भूमिका मुल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.
आयोजित प्रत्रकार परिषदेत विजय सिध्दावार,मुल नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, अनिल मोगरे, शिक्षण प्रसार मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. पणव वैरागडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोल बच्चुवार, प्रा. प्रशांत वासाडे, नगरसेव विवेक मुत्तलवार, अश्विन पालीवार, शिवसेनेचे माजी. तालुका अध्यक्ष प्रशांत गड्डलवार, सूरेश फुलझेले, दिनेश गोयल, संदिप मोहने, महेश गाजुलवार उपस्थित होते.


0 टिप्पण्या