Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीत दरोडेखोरांना 48 तासांत अटक | 35 हजारांची सोन्याची चैन हिसकावणारे जाळ्यात


गौतम मॉल परिसरातील घटना; मुख्य आरोपी व विधी संघर्ष बालक ताब्यात, 60 हजारांचा मुद्देमाल जप्त




चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : शहरात दहशत माजवणाऱ्या दरोडेखोरांचा थरार अवघ्या 48 तासांत संपला आहे. 25 मे 2026 रोजी रात्री 10 वाजता गौतम मॉल येथील रहिवासी संतोष जीवनचंद गोलेच्छा (51) यांच्या गळ्यातील 35 हजारांची सोन्याची चैन व लॉकेट हिसकावणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

फिर्यादी गोलेच्छा यांना दोन अज्ञात इसमांनी चेहऱ्यावर कापड बांधून अडवले. त्यांना गाडीवरून खाली पाडून धारदार व लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केले आणि सोन्याची चैन हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशन येथे गु.क्र. 597/26 कलम 309 (6) भा.न्या.स. अंतर्गत गुन्हा दाखल होता.

तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अहद खान पठाण (23) व एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. 
आरोपी यांचे कडुन सोन्याची चैन व लॉकेट, 15 ते 17 ग्रॅम, किंमत ₹35,000, काळी बॉक्सर मोटारसायकल किंमत ₹25,000,  लोखंडी हातोडी ₹100, चाकू  ₹20  असा एकूण मुद्देमाल  ₹60,120 जप्त करण्यात आले.
  
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार नसून कौटुंबिक अडचणीमुळे त्याने हा गुन्हा केल्याची चर्चा शहरात आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल. 

या कारवाईत पो.नि. अमोल काचोरे, पो.उपनि. सर्वेश बेलसरे, पो.नि. योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनि. गजानन तुपकर, सफौ महेन्द्र बेसरकर, पोहवा अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

--------------------------------------------
भद्रावती ब्रेकिंग गौतम मॉलजवळ 35 हजारांची सोन्याची चैन हिसकावणारे आरोपी 48 तासांत जेरबंद. मुख्य आरोपी अहद खान पठाण (23) व एक विधी संघर्ष बालक ताब्यात. चैन, बाईक, हत्यारासह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त. कौटुंबिक अडचणीतून गुन्हा केल्याची चर्चा. चंद्रपूर पोलिसांची दमदार कामगिरी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या