Ticker

6/recent/ticker-posts

पहेला येथे प्रथमच न भूतो न भविष्यते कवी , पत्रकार प्रबोधनकार, अभिनेते,अभिनेत्री नृत्यांगना, शाहीर, यांची टीम राहणार उपस्थित

सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे अभिष्टचिंतन सोहळ्यात घेणार सहभाग 



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -तालुक्यातील पहेला येथे सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त 9 जून 2026 ला सकाळी 11 वाजता पहेला येथे प्रथमच न भूतो न भविष्यती कवी ,पत्रकार, प्रबोधनकार ,अभिनेते, अभिनेत्री , नृत्यांगना, राजनेते, समाजातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असून माणुसकीचे नाते टिकविण्याकरिता व माणुसकी जपण्याकरिता व त्यांच्या सन्मान करण्याकरता सर्वांचा सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ, शाल ,देऊन सत्कार होणार आहे .सदर कार्यक्रम मनोरंजनात्मक राहणार असून  कार्यक्रमात अभिनेते अश्विन कुमार वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ .खुशाल बोपचे, दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे व ज्ञानपंख न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजी नगर, भंडारा जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष  रोशन जांभुळकर भंडारा जिल्हा परिषद चे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, गणेश पारधी राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ, सरपंच शिवशंकर मुंगाटे अड्याळ, त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या आगळ्यावेगळ्या होणाऱ्या कार्यक्रमाचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा सदर कार्यक्रमात जवळपास 65 मान्यवरांना मानाचे फेटे बांधायचे असल्यामुळे त्यांनी वेळेवर 10.30
वाजता सम्यक बुद्ध विहार आंबेडकर वार्ड येथे उपस्थित रहावे . सदर कार्यक्रमात मराठवाडा व विदर्भातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या